Breach of Privilege Notice to Jairam Ramesh : राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांच्याबाबत अपमानकारक विधान करणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश (jairam ramesh) यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. त्यांच्याविरोधात विशेष हक्कभंग (breach of privilege) केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
भाजपचे खासदार सुधांशु त्रिवेदी यांनी ही तक्रार केली आहे. जयराम रमेश यांच्यावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, खासदार जयराम रमेश यांनी गेल्या अधिवेशनात सभापतींबाबत हे विधान केलं होतं.
"सभापतींनी सत्ताधारी पक्षाचे 'चिअरलीडर ' न होता विरोधकांचे म्हणणे पण ऐकलं पाहिजे," असे विधान जयराम रमेश यांनी सभागृहात केले होते.
उद्योगपती गौतम अदानी यांच्याबाबत जेपीसीची मागणी करणाऱ्या काँग्रेसने सभागृहात गदारोळ केला होता. त्यामुळे सभागृहाचे कामकाज झाले नाही. यावेळी जयराम रमेश यांनी हे विधान केलं होते.
राज्यसभेच्या विशेषाधिकार समितीकडे सुधांशु त्रिवेदी यांची तक्रार आल्याचे समितीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. पण या प्रकरणी सभापतींनी कुठलीही कारवाई केलेली नाही. विशेषाधिकार समितीच्या चौकशीत जयराम रमेश दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई होऊ शकते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.