नवी मुंबई : भाजपच आमदार गणेश नाईक (Ganesh Naik) यांच्यावर महिला आयोगाने दिलेल्या निर्देशांनुसार अटकेची कारवाई अटळ असतानाच आता तक्रारदार महिला त्यांच्याविरोधात माध्यमांसमोर आली असून तिने स्वतःहून आपली DNA टेस्ट करावी अशी मागणी केली आहे. माझ्यावर अत्याचार झाला आहे, माझं शोषण झालं आहे, मला टॉर्चर करण्यात आलं आहे, अशी उद्विग्न प्रतिक्रिया तक्रारदार महिलेने व्यक्त केली आहे. यासोबतच मला कोणत्याही राजकीय पक्षाचा दबाव, किंवा पैशांचा मो नसल्याचे ही संंबंधित महिलेने स्पष्ट केले आहे.
तसेच आमच्यावर सुरुवातीपासून भेदभाव होत आला आहे, कुठेही आमचा स्वीकार करण्यात आलेला नाही, आम्हाला लपवून ठेवण्यात आलं. नाईकांना माझ्या मुलाविषयी कोणतीही प्रेमाची भावना नाही. फक्त मुलाला वडिलांचे नाव मिळावं हीच अपेक्षा आहे आणि DNA टेस्ट शिवाय याचा निर्णय लागू शकत नाही. त्यामुळे आमची DNA टेस्ट करावी आणि त्यासाठी जिथे जिथे मला मदत मिळेल तिथे तिथे जाणार आहे.
आमदार गणेश नाईक (Ganesh Naik) यांच्यावर एका महिलेच्या इच्छेविरुद्ध शारिरीक संबंध ठेवणे आणि त्यापासून झालेल्या अपत्याचा स्विकार न करण्याचा आरोप आहे. त्यांच्याविरुद्ध याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीनुसार बेलापूर आणि नेरुळ पोलिस ठाण्यात फसवणूक आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ''गणेश नाईक यांना याप्रकरणी तत्काळ अटक करण्याची कार्यवाही केली जाईल,'' असे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी सांगितले आहे.
''काही दिवसापूर्वी या महिलेने राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली होती, त्याप्रकरणी आयोगाने नवी मुंबई पोलिसांना यावर योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. यानंतर पोलिसांनी आज गणेश नाईक यांच्याविरुद्ध जीवे मारण्याची धमकी देणे व इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवणे हे गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे गणेश नाईक यांना याप्रकरणी तत्काळ अटक करण्याची कार्यवाही देखील लवकरच केली जाईल, असे चाकणकर म्हणाल्या.
पीडित महिलने राज्य महिला आयोगाकडे केल्या अर्जामध्ये भारतीय दंड विधान 376, 420, 504, 505 अन्वये गुन्हा नोंद करुन पोलिसांकरवी संरक्षण उपलब्ध करुन द्यावे, अशी विनंती केली आहे. महिलेने केलेल्या आरोपानुसार, सदर महिला व गणेश नाईक हे २७ वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहात आहेत. या संबंधातून त्यांना एक १५ वर्षांचा मुलगाही आहे.
गणेश नाईक यांनी आपल्यावर पिस्तूल रोखून जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच, १९९३ पासून लग्नाचे आमिष दाखवत ते सातत्याने आपले लैंगिक शोषण करीत असल्याचा आरोप या महिलेने तक्रारीत केला आहे. पीडित महिला जेव्हा गणेश नाईक यांच्याकडे लग्न करण्याबाबत विचारणा करत असे तेव्हा ते तिला जीवे मारण्याची धमकी देत. पीडितेने नाईक यांच्याकडे वैवाहीक अधिकार मागीतले या वेळी त्यांनी तिला तिच्या मुलासह जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही महिलेने तक्रारीत म्हटलं आहे.
गणेश नाईक यांचे चिरंजीव संदीप नाईक यांनीही संबंधित महिलेने गणेश नाईक यांच्यासोबत असलेले संबंध संपवून इतर ठिकाणी निघून जावे यासाठी सातत्याने त्रास आणि धमक्या देत असल्याचे तक्रारीत म्हटलं आहे. नाईक कुटुंबीयांच्या त्रासाबद्दल नेरुळ पोलीस स्थानकात वारंवार तक्रार देऊनही कोणतीही कार्यवाही होत नाही. त्यामुळे आपल्याला न्याय मिळावा, अशी मागणी पीडितेने राज्य महिला आयोगाकडे केली होती. या प्रकरणाची चैाकशी करण्याच्या सूचना महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिल्या आहे, तर गणेश नाईक यांची डीएनए चाचणी करावी, अशी मागणी शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.