BMC News : मुंबई महापालिकेतून (BMC) एक अजबगजब प्रकार समोर आला आहे. मुंबईचा डोलारा सांभाळणाऱ्या मुंबई मुख्यालयाच्या उपहारगृहातून गेल्या वर्षभरात जेवणाची ताटे, चमचे, ग्लास अशी हजारो भांडी चोरीला गेल्याचे समोर आले आहे. महापालिकेतील कर्मचारी,अधिकारी जेवण,नाश्ता आपल्या कार्यालयात मागावतात. पण खाल्ल्यानंतर ही भांडी उपहार गृहाला परत करतच नाहीत, अशी बाब उघडकीस आली आहे. (Theft of plates, bowls, spoons from the canteen of Mumbai Municipal Corporation)
महापालिकेतील काही कर्मचारी, अधिकारी उपहारगृहातून आपल्या कार्यालयातच जेवण,नाश्ता मागवतात.जेवण झाल्यानंतर भांडी कार्यालयात तशीच ठेवली जातात,पण ती उपहारगृहाला परत केली जात नाहीत. कॅन्टीनच्या कर्मचाऱ्यांनी भांडी मागितल्यास घरातून आणल्याचे सांगितले जाते.या बनवाबनवीमुळे उपहारगृह चालक मेटाकुटीला आले आहेत. यामुळे उपहारगृह चालकांनी पालिकेतील अधिकारी,कर्मचाऱ्यांना भांडी परत करण्याचे आवाहन केले आहे. (Mumbai News)
वर्षभरात अशा प्रकारे हजारो भांडी गायब झाली असून कंत्राटदारांचे ४० ते ५० हजारांचे नुकसान झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. यासाठी थेट उपहारगृहाच्या दारातच एक फलक लावण्यात आला असून त्यावर, उपहारगृहाची भांडी घेऊन जाऊ नये. उपहारगृहाच्या कर्मचाऱ्यांची गैरसोय होत असल्याची सूचना लिहली आहे. तसेच,उपहारगृहातून भांडी घेऊन जाऊ नका! उपहारगृहातून हजारो चमचे,ताटे,ग्लास गायब झाल्याने यापुढे उपहारगृहाबाहेर भांडी घेऊन जाऊ नका, असे आवाहन कर्मचारी, अधिकाऱ्यांना करण्यात आले आहे
वर्षभरात एवढी भांडी हरवली
चमचे - ६ ते ७ हजार
लंच प्लेट - १५० ते २००
नाश्ता प्लेट - ३०० ते ४००
ग्लास - १०० ते १५०
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.