Anandraj Ambedkar, Latest News
Anandraj Ambedkar, Latest News Sarkarnama
मुंबई

..तर बाबासाहेबांच्या 'त्या' पुतळ्याला माझा विरोध असेल; आनंदराज आंबेडकर

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : मुंबईतील इंदू मिल येथे भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभारण्यात येत आहे. मात्र, येथे उभारण्यात येणाऱ्या पुतळ्यात त्रुटी असून त्यामध्ये दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे. येथील पुतळा जर व्यवस्थित झाला नाही तर माझा या पुतळयाला विरोध असेल, असे स्पष्ट मत भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांनी व्यक्त केले आहे. (Anandraj Ambedkar, Latest News)

आनंदराज आंबेडकर म्हणाले, काल (ता.१६ नोव्हेंबर) मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मुंबईतील इंदू मिल मध्ये गेले होते. मात्र येथे उभारण्यात येणाऱ्या पुतळ्यामध्ये त्रुटी असून त्यामध्ये दुरूस्ती करण्याची आवश्यकता आहे. जो डमी पुतळा बनला गेला आहे, तो बाबासाहेबांच्या चेहऱ्या सारखा नसून हाताची ठेवण वेगळी आहे. बाबासाहेबांचा सर्वात चांगला पुतळा मुंबईत मंत्रालया समोर आहे. या सारखाच पुतळा येथेही व्हायला हवा. मात्र डमी पुतळा फायनल करू नये, जर तो तसाच उभा केला गेला तर त्याला माझा विरोध होईल. इंदू मिल साठी मी देखील खारीचा वाटा उचलला आहे, अशा शब्दात आनंदराज आंबेडकर यांनी आपलं मत व्यक्त केली.

ते पुढे म्हणाले, कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक विजयस्तंभास मानवंदना करण्यासाठी १ जानेवारीला देशभरातून विविध मान्यवरांसह मोठ्या संख्येंनी अनुयायी येतील. त्यामुळे यंदा या कार्यक्रमासाठी संपूर्ण निर्बंध शिथिल करावे. गेली २ वर्ष या कार्यक्रमाला निर्बंध होते. मात्र यंदा ते निर्बंध सरकारने लावू नयेत. तसेच तिथे जाण्यासाठी गाड्यांची मोठी संख्या असते पण बरेच जणांना तिथे चालत जावे लागते. याविषयी देखील निर्णय झाले पाहिजेत. तसेच वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी देखील जागा द्यावी, अशीही मागणी त्यांनी केली.

दरम्यान, काल इंदु मिल येथील स्मारकांच्या कामाची पाहणी​ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली असून मार्च 2024 आधी हे काम पूर्णत्वास येईल. येथे बाबासाहेबांचा 450 फूटांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. हे स्मारक लवकरच साकारले जावे ही आमची भावना आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT