नागपूर : वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी 'चले जाव' आंदोलनात सहभागी झालेल्या नागपूरच्या 92 वर्षीय ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक लिलाताई चितळे राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्या आहेत.
भारत जोडो यात्रेतून माझ्या देशाच्या घटनेचे रक्षण केले जात आहे. त्यासाठी मी आपल्या सोबत आहे. आता मरण आले तरी शांतीने येईल. वरती गेल्यावर मी सगळ्यांना सांगेल की तुमचे स्वप्न हे लोक कधीही मोडणार नाहीत, असे भावूक उद्गार त्यांनी काढले. (freedom fighter Lilatai Chitle, Bharat Jodo Yatra Latest News )
कॅाग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांच्यासोबत लिलाताई यात्रेत सहभागी झाल्या होत्या. यावेळी त्या म्हणाल्या की, आपल्याला स्वातंत्र्य मिळावे यासाठी गरीब, श्रीमंतांसोबत सगळ्या धर्माचे लोक गांधीजींच्या साेबत उभे राहिले. त्यातून एक मानवी शक्ती निर्माण झाली. इंग्रजांकडे सगळ्या प्रकारची शस्त्रे होती. तरी देखील त्यांना हा देश साेडून जाण्यासाठी आपण बाध्य केले. भारत जाेडाे यात्रेत हेच होत आहे, असे लिलाताई म्हणाल्या.
'चले जाव' आंदोलनातील आठवणींना उजाळा देताना लिलाताई म्हणाल्या, 9 ऑगस्ट 1942 ला मी 12 वर्षांची हाेते. गांधींजींनी करा किंवा मराचा संदेश दिला हाेता. या आवाहनाला प्रतिसाद देत मी आणि माझ्या दाेन मैत्रिणींनी कॉलेजसमाेर जाऊन घाेषणा दिल्या. त्यामुळे आम्हाला पकडण्यात आले. मात्र लहान असल्यामुळे संध्याकाळपर्यंत पोलीस चाैकीत बसवून साेडून दिले. मात्र, माझे वडील आणि भाऊ यांना साडेतीन वर्षे तुरुंगात डांबण्यात आले होते. याप्रकरणी न्यायालयातही हजर केले नव्हते, असे त्या म्हणाल्या.
लीलाताइ चितळेंना त्यांच्या 91 व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी साेनिया गांधींचा फाेन आला हाेता. त्यावेळी राहूल गांधी सुरक्षित राहावेत म्हणून आपण दरराेज प्रार्थना करताे, असे त्यांनी सांगितले हाेते. दरम्यान, आज त्या राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) यात्रेत त्या सहभागी झाल्या आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.