Eknath Shinde News| Balasaheb Thackeray| 
मुंबई

बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा नाहीच..! गुरुपोर्णिमेनिमित्त एकनाथ शिंदेंच ट्विट

Eknath Shinde News| Balasaheb Thackeray| एकनाथ शिंदे यांनी आनंद दिघेंच्या मार्गदर्शनात ठाण्यात राजकारणाचे धडे गिरवले

सरकारनामा ब्युरो

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह 40 आमदारांनी बंडखोरी भाजपसोबत हातमिळवणी करत सत्ता स्थापन केली. शिवसेना (Shivsena) आणि एकनाथ शिंदें गटाकडून एकमेकांवर अनेक आरोप प्रत्यारोप करण्यात आले. शिवसेनेने एकनाथ शिंदेवर गद्दारी केल्याचा आरोपही केला. मात्र मुख्यमंत्री शिंदेंनी आम्ही कधीही बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा केली नाही आणि करणारही नाही, असे वारंवार सांगितले. अशात काल संतोष बांगर यांनी केलेल्या शक्तिप्रदर्शनानंतर एकनाथ शिंदे यांच्या आजच्या गुरू पोर्णिमेच्या ट्वीटची जोरदार चर्चा रंगली आहे.

एकनाथ शिंदे यांनी प्रत्येकवेळी माध्यमांसमोर, आम्ही दिवंगत बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे आणि शिवसेनेच्या शिकवणीवर, हिंदुत्वाचा मुद्द्यावर पुढे घेऊन जाऊ, अशी भूमिका मांडली. अशात त्यांनी आज गुरु पोर्णिमेनिमीत्त केलेल्या ट्वीटची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या ट्वीटमध्ये उद्धव ठाकरे आणि धनुष्यबाणाचा कुठेही उल्लेख दिसत नसल्याने त्यांना उद्धव ठाकरेंसह धनुष्यबाणाचाही विसर पडला का? अशा चर्चा माध्यमांवर सुरू झाल्या आहेत.

एकनाथ शिंदे यांनी, 'बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा नाहीच. विझणार कधीच अंगार नाही, हिंदुत्वाशिवाय विचार नाही.... गुरुपौर्णिमेनिमित्त विनम्र अभिवादन…' ट्वीट करत गुरु पोर्णिमेच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. या ट्विटमध्ये दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा फोटोही लावण्याच आला आहे. मात्र यात कुठेही उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचा उल्लेख नसल्याने एकनाथ शिंदेंना उद्धव ठाकरेंसह धनुष्यबाणाचाही विसर पडला का? अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. दोन महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या धर्मवीर चित्रपटातही गुरूपोर्णिमेचा प्रसंग दाखवण्यात आला आहे. यात आनंद दिघे, गुरूपोर्णिमेनिमित्त बाळासाहेब ठाकरे यांना शोधत शोधत त्यांच्यापर्यंत पोहचतात आणि बाळासाहेबांच्या पायांचे पूजन करतात, असा प्रसंग दाखवण्यात आला आहे.

यात आणखी एक विशेष बाब म्हणजे, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ट्वीटच्या आधी एकनाथ शिंदे यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त ट्वीट करत, आपण बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा पुढे घेऊन जाणार आहोत, असं थेट सूचित केल्याच दिसत आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या ट्वीटला आता वेगळ महत्त्व प्राप्त झालं आहे. एकनाथ शिंदे यांनी आनंद दिघेंच्या मार्गदर्शनात ठाण्यात राजकारणाचे धडे गिरवले. अनपेक्षितपणे मुख्यमंत्रीपद मिळाल्यानंतर त्यांनी शिवाजीपार्कवरील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळासह आनंदाश्रमात जाऊनही त्यांच्या स्मृतींना अभिवादनही केलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT