शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रेंची शिंदे गटाशी हातमिळवणी

बंडखोर आमदारांविरोधात शीतल म्हात्रे यांनी आंदोलन केलं होतं, त्यानंतर आठ दिवसातच शीतल म्हात्रे या शिंदे गटात सामील झाल्या आहेत.
sheetal mhatre News, Shivsena Latest Marathi News
sheetal mhatre News, Shivsena Latest Marathi Newssarkarnama
Published on
Updated on

मुंबई : माजी नगरसेविका आणि शिवसेनेच्या प्रवक्या शीतल म्हात्रे (sheetal mhatre)यांनी एकनाथ शिंदे (eknath shinde) गटाशी हातमिळवणी केली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत बंडाळी सुरू झाल्यामुळे हा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या साठी मोठा धक्का मानला जात आहे. (sheetal mhatre joined shinde group)

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडाळी केल्यानंतर बंडखोर आमदारांविरोधात शीतल म्हात्रे यांनी आंदोलन केलं होतं, त्यानंतर आठ दिवसातच शीतल म्हात्रे या शिंदे गटात सामील झाल्या आहेत. शिवसेनेच्या मुंबईतील एक आक्रमक नगरसेविका म्हणून त्यांची ओळख आहे. 2012 आणि 2017 ला सलग दोन वेळा मुंबई महापालिका निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला आहे.

शीतल शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत त्यांना पाठिंबा असल्याचं जाहीर केलं आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख, शाखाप्रमुख फुटल्यानंतर मुंबईतील पहिल्या माजी नगरसेविका फुटून शिंदे गटात सामील झाल्या आहेत."बाळासाहेबांची शिवसेना टिकवण्याचा जो प्रयत्न सुरू आहे. त्यात मी माझा खारीचा वाटा देत आहे," असे त्यांनी सांगितले.(Shivsena Latest Marathi News)

sheetal mhatre News, Shivsena Latest Marathi News
Mumbai : फडणवीस मंत्रीमंडळात कोण कोण ? शिंदे गटाला मिळणार झुकते माप ..

कोण आहेत शीतल म्हात्रे

  • शीतल म्हात्रे यांच्या राजकीय कारकिर्दीला 12 वर्षांपूर्वी सुरूवात झाली.

  • उत्तर मुंबईतील दहिसरच्या वॉर्ड नंबर 8 मधून दोन वेळा नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत.

  • त्यांनी काही काळ पत्रकार म्हणूनही काम केलंय.

  • पदाधिकारी म्हणून काम केल्यानंतर त्यांना नगरसेवक पदाची उमेदवारी मिळाली.

  • 2012 मध्ये त्या पहिल्यांदा निवडणूक जिंकल्या.

  • शीतल म्हात्रे शिवसेनेच्या प्रवक्त्या होत्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com