Siddhivinayak Temple Trust news  sarkarnama
मुंबई

MNS : नव्या वादाला तोंड फुटलं ; मनसेनं उलगडली ठाकरे गटाच्या नेत्याची ती 'डायरी'

सरकारनामा ब्युरो

Siddhivinayak Temple Trust news :सिद्धीविनायक मंदीरातील (Siddhivinayak Temple Trust) गैरव्यवहारावरुन सध्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि ठाकरे गट यांच्याच जुंपली आहे. गेल्या काही दिवसापासून 'डायरी'वरुन रोज आरोप-प्रत्यारोप होत आहेत.

काही दिवसांपूर्वी मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी सिद्धीविनायक मंदीरात घोटाळा झाल्याचा आरोप अभिनेते आणि शिवसेनेचे सचिव आदेश बांदेकर यांच्यावर केला होता. आता पुन्हा बांदेकर यांच्यावर मनसे नेते, सरचिटणीस मनोज चव्हाण (MNS Secretary Manoj Chavan) यांनी गंभीर आरोप केला आहे. चव्हाण यांनी टि्वट करीत हे आरोप केले आहेत.

सिद्धिविनायक न्यास मंदिराकडून दरवर्षी दैनंदिनी डायरी काढते असते परंतु यावर्षी ती निघाली नाही त्याला आदेश बांदेकर जबाबदार असल्याचे मनोज चव्हाण यांनी आरोप केला आहे. या डायरीवर उद्धव ठाकरे यांचा फोटो हवा असा बांदेकर यांचा अट्टाहास असल्याची माहिती आहे. याला काही विश्वस्तांचा विरोध असल्याचा दावा चव्हाण यांनी रविवारी केला आहे.

आज पुन्हा चव्हाण यांनी या विषयावरुन बांदेकरांवर आरोप केले आहेत. 'आदेश बांदेकर विरपन्ना गँगचे सभासद असल्याचा टोला चव्हाणांनी हाणला आहे. "डायरी छापली नसली तरीही त्यासाठी निविदा काढण्यात आली होती,' असा दावा चव्हाणांनी केल्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

"आदेश बांदेकराचा खोटारडेपणा बघा. माध्यम प्रतिनिधींना माहिती सांगतायत की खर्च टाळण्यासाठी दैनंदिन डायरी छापली नाही मग निविदा का काढली ? इतकी गडबड करून निवादा खुली सुद्धा केली आणि हे काम स्नेहा प्रिन्ट्स सर्व्हिस ला दिले. इतके होऊन सुद्धा फक्त उद्धव ठाकरे यांच्या फोटोसाठी या माणसाने डायरी प्रिंटींग थांबवून ठेवली आहे. या खोटारड्या माणसाला या पवित्र देवस्थानाच्या मंडळ अध्यक्ष पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही. यावर बांदेकरांनी उलट प्रतिक्रिया द्यावीच,"असे सांगत देवस्थानची काही कागदपत्र पुरावा म्हणून चव्हाण यांनी टि्वट केली आहेत.

"राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फोटोला इतका विरोध किती ही नीच मानसिकता,"असे चव्हाण यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटलं आहे. चव्हाण यांनी टि्वट केलेल्या कागदपत्रानुसार, ९ नोव्हेंबर रोजी ही निविदा काढण्यात आली असून इ-निविदा स्वीकारण्याची अंतिम तारीख १६ नोव्हेंबर रोजी ठरवण्यात आली होती. आता यावर आदेश बांदेकर काय उत्तर देणार याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT