Sushma Andhare : देवेंद्रजी, वारकऱ्यांचा अवमान करणाऱ्या संभाजी भिडेंना क्लिनचीट का दिली ?

Sushma Andhare : माऊली, तुकोबापेक्षा मनू श्रेष्ठ आहे,' हा तुकोबारायांचा, ज्ञानेश्वरांचा, वारकऱ्यांचा अपमान नाही का ?
Sushma Andhare
Sushma Andharesarkarnama
Published on
Updated on

Sushma Andhare ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे या सध्या सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी अंधारे यांनी आमदार शहाजी बापू पाटील, देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार यांच्यावर घणाघात केला. अंधारे या महाप्रबोधन यात्रेच्या निमित्ताने रविवारी बोलत होत्या. (Sushma Andhare news update)

अंधारे यांनी हिंदू देवी देवतांबद्दल आणि संतांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. यामुळे सुषमा अंधारे यांच्या अडचणी वाढत आहेत. त्याला अंधारे यांनी प्रत्युत्तर देत शिंदे फडणवीस सरकारवर पलटवार गेला आहे.

अंधारे यांनी संभाजी भिडे यांच्यावर टीकास्त्र डागले. त्यांनी वर्तमानपत्रातील एका वृत्ताचे कात्रण दाखवत देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला. त्या म्हणाल्या, "फडणवीसांनी भिडेंना क्लिनचीट का दिली ? 'भिडे सांगतात की माऊली, तुकोबापेक्षा मनू श्रेष्ठ आहे,' हा तुकोबारायांचा, ज्ञानेश्वरांचा, वारकऱ्यांचा अपमान नाही का, यावर आशिष शेलार उत्तर देतील का? ते म्हणतात, मी वारकऱ्यांचा अपमान केला?"

Sushma Andhare
Karnataka News : भाजपमधील माजी मंत्र्याने केली नव्या पक्षाची घोषणा ; राजकीय समीकरण बदलणार

पेड किर्तनकार

अंधारे म्हणाल्या, "व्हायरल क्लिप हे भाजपाचे षडयंत्र आहे. खरा वारकरी असा वाद घालणार नाही. असं काही अमंगल करणार नाही. पंधरा वर्षांनंतर ही क्लिप व्हायरल होत आहे. विरोध करणारे हे किर्तनकार नाहीत, ते पेड किर्तनकार आहेत, प्रहसनकार आहेत. मोहन भागवत यांच्या संप्रदायचे ते किर्तनकार आहेत,"

मग त्यावर चर्चा का होत नाही

देवेंद्रजींच्या भाषेत मी जर चार महिन्यांचे बाळ असेल आणि चार महिन्यातच त्यांना सळो की पळो करत असेल तर शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या गटातील शिवसैनिकांच्या मनात किती राग असेल असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. माझ्या क्लिपबाबत चर्चा होते, मात्र सावरकरांनीही तेच लिहून ठेवलं आहे, श्री श्री रविशंकर यांनी देखील हेच लिहलं आहे, मग त्यावर चर्चा का होत नाही. मी शिवसेनेत असल्यामुळे हे सर्व सुरू असल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे.

मी एकनाथ शिंदे यांचं लेकरु..

सुषमा अंधारे म्हणाल्या, "बापू आमचा एक नंबरचा अँक्टरमाणूस, जसा चित्रपट मिळतो ते तसा रोल करतात, एकेकाळी ते पृथ्वीराज चव्हाण यांच्या जवळचे असल्याचे सांगत होते, त्यानंतर ते नारायण राणे यांचे कौतुक करायचे. आम्हाला बापूचा अभिमान आहे. बापू सारखा अभिनय बापूचं करु शकेल. "मी एकनाथ शिंदे यांचं लेकरु आहे," असे बापू म्हणतात. पण ते एकनाथ शिंदे हे त्यांच्यापेक्षा वयाने लहान आहेत,"

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com