Ajit Pawar, Jayant Patil News Sarkarnama
मुंबई

Ajit Pawar News : राष्ट्रवादीत पुन्हा भाकरी फिरणार! अजित पवार प्रदेशाध्यक्ष तर जयंत पाटलांकडे जाणार 'हे' पद?

Jayant Patil News : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे पाच वर्षापासून त्या पदावर आहेत.

सरकारनामा ब्यूरो

Ncp News : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पक्षाच्या मेळाव्यात बोलताना बुधवारी मोठे विधान केले. अजित पवार म्हणाले, विरोधी पक्षनेतेपद नको, पक्ष संघटनेत जबाबदारी द्या, त्या पदाला न्याय देईल. अजित पवार यांच्या विधानानंतर राजकीय वर्तुळात एकच चर्चा झाली.

त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) पुन्हा भाकरी फिरणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे पाच वर्षापासून या पदावर आहेत. त्यामुळे आता अजित पवार यांच्या वक्तव्यानंतर यामध्ये बदल होणार असल्याची चर्चा आहे. अजित पवार यांना प्रदेशाध्यक्ष पद दिले तर जयंत पाटील यांच्यावरही मोठी जबाबदारी द्यावी लागले.

त्यामुळे जयंत पाटील यांना विरोधी पक्षनेते पद दिले जाऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, राज्याच्या विधानसभेत विरोधी पक्ष नेते पदावर एका समाजाची व्यक्ती असेल, तर प्रदेशाध्यक्षपदावर दुसऱ्या समाजाची व्यक्ती असावी, अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली आहे. सद्यःस्थितीत विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्याकडे असल्याचे प्रदेशाध्यक्ष पदी ओबीसी समाजाच्या नेत्याला संधी द्यावी, असे भुजबळांनी अप्रत्यक्षपणे प्रदेशाध्यक्षपदावर दावा ठोकला असल्याचे मानले जात आहे.

या वेळी अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, नव्या चेहऱ्यांना आपण संधी दिली पाहिजे. इतकी वर्ष काम केले. मला सगळ्यांना सांगायचे आहे, मला विरोधी पक्ष नेते पदावर इच्छा नव्हती. मात्र, सगळे आमदार बोलले तुम्ही व्हा म्हणून जबाबदारी घेतली. कोणी म्हणते मी कडक वागत नाही. मला विरोधी पक्ष नेते पदावरून मुक्त करा, पक्षातील जबाबदारी द्या. संघटनेत कोणतेही पद द्या, त्या पदाला मी न्याय असा शब्द देतो, असे पवार यांनी स्पष्ट केले.

तर मेळाव्यात बोलताना जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले होते, प्रदेशाध्यक्ष पदावर मला पाच वर्ष एक महिना झाला आहे. अजितदादांनी तर माझ्या प्रदेशाध्यक्ष पदाचे महिनेही मोजले आहेत. मी पाच वर्षापासून सांगतोय की बुथ कमिट्यांवर लक्ष द्या, तसे केले तर आपला पक्ष मजबूत होईल, असे जयंत पाटील म्हणाले होते. अजित पवार यांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीमध्ये पुन्हा भाकरी फिरणार का? अशी चर्चा सुरु झाली आहे.

Edited by : Amol Jaybhaye

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT