Election Commission Latest News sarkarnama
मुंबई

Election Commission News : लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होणार? निवडणूक आयोगाचे अधिकाऱ्यांना महत्त्वाचे आदेश

Lok Sabha and Vidhan Sabha election News : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि काँग्रेसने जोरदार तयारी सुरू केली आहे.

दीपा कदम

Central Election Commission News : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप (BJP) आणि काँग्रेसने जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यामुळे लोकसभा आणि महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुका एकत्र होणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. भाजप आणि राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी याबाबतचे संकेत दिले आहेत. त्यातच आता केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामांशिवाय अन्य कामे देऊ नका, असे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत.

राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी एक परिपत्रक जारी केले आहे. त्यामध्ये निवडणुकीचे काम वेळापत्रकानुसार होणे आवश्यक असल्याने उपजिल्हा निवडणूक अधिकारी व त्यांच्या अंतर्गत असलेल्या निवडणूक कर्मचाऱ्यांकडे निवडणुकीव्यतिरिक्त कोणतेही काम दिले जाऊ नये, असे म्हटले आहे.

त्यामुळे आता महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक लोकसभेसोबतच होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाच्या मुख्य आयुक्तांना एक आदेश जारी केला. त्यात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामाशिवाय अन्य जबाबदारी न देण्याचे निर्देश जारी करण्यात आले आहे.

दोन्ही निवडणुकांच्या पूर्वतयारीसाठी अधिकाऱ्यांनी मतदारसंघातील स्थितीचे अहवाल तयार करण्याची तयारी सुरू केली आहे. महाराष्ट्र आणि हरियाना विधानसभेची मुदत ऑक्टोबर २०२४ मध्ये संपणार आहे. लोकसभेची निवडणूक एप्रिल २०२४ मध्ये होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र (Maharashtra) तसेच हरियानातील विधानसभा विसर्जित करून दोन्ही राज्यांच्या निवडणुका लोकसभेबरोबरच होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

राज्यातील विधानसभा तसेच लोकसभा मतदारसंघांमध्ये निवडणुकीची पूर्वतयारी, संचलन, मतदान यंत्रांची तपासणी आणि मतदार याद्या तयार करण्याचे काम निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सुरू केले आहे. त्यातच आता केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना कोणतीही अतिरिक्त जबाबदारी न देण्याच्या सूचना केल्यामुळे लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

Edited by : Amol Jaybhaye

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT