Pancham Kalani News : पवारांची परवानगी घेऊनच भाजपत प्रवेश केला; पण, बीजेपीने शब्द पाळला नाही : पंचम कलानींच्या वक्तव्याने खळबळ

Ulhasnagar Ncp News : उल्हासनगरमधील कलानी परिवार मध्यंतरी अडीच ते तीन वर्षांच्या काळासाठी भाजपमध्ये गेला होता.
Pancham Kalani News
Pancham Kalani NewsSarkarnama
Published on
Updated on

Ulhasnagar News : उल्हासनगरमधील कलानी परिवार मध्यंतरी अडीच ते तीन वर्षांच्या काळासाठी भाजपमध्ये गेला होता. मात्र, भाजपचा दबाव असल्याने आपण जाताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी परवानगी घेऊनच गेलो होतो, असा खुलासा आता पप्पू कलानी यांची सून माजी महापौर पंचम कलानी यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्याने चर्चांना उधाण आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री जितेंद्र आव्हाड आणि माजी खासदार आनंद परांजपे यांच्या उपस्थित उल्हासनगरमध्ये शनिवारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये माजी महापौर पंचम कलानी (Pancham Kalani) यांनी केलेल्या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावला आहेत.

Pancham Kalani News
New Parliament Building News : नव्या संसद भवनाच्या उद्घाटनावर राहुल गांधींची एका वाक्यात प्रतिक्रिया

उल्हासनगरचे माजी आमदार पप्पू कलानी सुरुवातीपासून शरद पवार (Sharad Pawar) यांचे निकटवर्तीय मानले जातात. पप्पू कलानी यांना एका हत्याप्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर मध्यंतरीच्या काळात पप्पू कलानी यांचा मुलगा ओमी कलानी याने भाजपसोबत जवळीक साधली होती. टीम ओमी कलानी नावाने संघटना स्थापन करत त्याचे सर्व उमेदवार भाजपच्या चिन्हावर उभे केले होते.

मात्र, राज्यात महाविकास आघाडी सरकार येताच पप्पू कलानी यांची जेलमधून सुटका झाली. भाजपपासून फारकत घेऊन पुन्हा एकदा कलानी परिवार राष्ट्रवादीत आला. यानंतर नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात पप्पू कलानी यांची सून माजी महापौर पंचम ओमी कलानी यांनी एक वक्तव्य केले, आपण भाजपमध्ये (BJP) जाताना शरद पवार यांची परवानगी घेऊनच गेलो होतो, असा खुलासा पंचम कलानी यांनी केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे उल्हासनगर शहरात चर्चांना मोठे उधाण आले आहे.

Pancham Kalani News
Wrestler Andolan Delhi : 'विनेश तू तर माझ्या कुटुंबातीलच…' काँग्रेसने शेअर केला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 'तो' व्हिडीओ : कुस्तीपटूंवरुन राजकारण तापले

याबाबत त्यांना विचारले असता, तेव्हाची परिस्थितीच तशी होती की आपण शरद पवार यांच्या परवानगीने भाजपात गेलो होतो. कारण त्यावेळी काही मोठ्या कौटुंबिक अडचणी होत्या, असे कलानी म्हणाल्या. कलानी परिवार पुन्हा एकदा राष्ट्रवादीत आला, आता पंचम कलानींच्या वक्तव्यामुळे उल्हासनगरमध्ये एकच चर्चा सुरु झाली आहे.

Edited by : Amol Jaybhaye

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com