Aslam Sheikh
Aslam Sheikh Sarkarnama
मुंबई

`मंत्री अस्लम शेख यांनाही ड्रग केसमध्ये अडकविण्याचा कट होता...`

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : कार्डिलिया क्रुझ ड्रग प्रकरणात महाराष्ट्राच्या बदनामीचे मोठे कारस्थान रचले जात होते, असा खळबळजनक आरोप करून मंत्री नवाब मलिक यांनी या वादात आणखी एका मंत्र्याचे नाव घेतले. राज्याचे वस्त्रोद्योगमंत्री अस्लम शेख यांना कार्डिलिया क्रुझवर नेण्यासाठी आग्रह केला जात होता, असे सांगत मलिक यांनी पुन्हा खळबळ उडवून दिली. महाराष्ट्राच्या मंत्र्यांना आणि त्यांच्या मुलांना ड्रग प्रकरणात अडकविण्यासाठी हा कट रचला जात होता. `उडता पंजाब`नंतर `उडता महाराष्ट्र` अशी प्रतिमा करण्यासाठी हे सारे सुरू होते, असा दावा मलिक यांनी केला.

मलिक यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत आर्यन खान ड्रग केस हे खंडणी आणि अपहणारचे प्रकरण असल्याचा दावा केला. त्यात मोहित कंबोज, मनीश भालुशाली, सुनील पाटील, किरण गोसावी यांनी त्यात भूूमिका बजावली. आर्यन खान हा स्वतःहून कार्डिलिया क्रुझवर गेलेला नव्हता. तर त्याला बोलविण्यात आले होते. त्यात कंबोज याची महत्वाची भूमिका होती. एवढेच नाही तर अस्लम शेख यांनाही या क्रुझवर येण्यासाठी सातत्याने आग्रह केला जात होती. याबाबत ते आणखी माहिती पत्रकारांना देतील, असे मलिक यांनी सांगितले.

महाराष्ट्राची एसआयटी (SIT) आणि केंद्र सरकारनेही या प्रकरणी वेगळ्या पथकाकडून चौकशी सुरू केली आहे. त्यात या साऱ्या बाबींचा उलगड होईल. किरण गोसावी याने एनसीबीच्या कोठडीच आर्यन खान याच्यासोबत घेतलेल्या सेल्फिमुळे त्यांचे 18 कोटी रुपये बुडाल्याचे मलिक यांनी पुन्हा सांगितले.

कार्डिलिया क्रुझवरून किती लोकांना ताब्यात घेतले, हे समीर वानखेडे स्पष्टपण का सांगू शकले नाहीत? येथून 8 की 10 लोकांना अटक झाल्याचे ते सांगत होते. मात्र प्रत्यक्षात 11 लोकांना ताब्यात घेतले होते. त्यातील तीन जणांना नंतर सोडून देण्यात आले. यातच सारी मेख आहे. त्यात मोहित कंबोज याच्या मेव्हण्यासहीत तिघांना सोडण्यात आले होते. प्रतीक गाभा आणि आमिर फर्निचरवाला हे आर्यनला घेऊन गेले होते. मोहित कंबोजच्यामार्फत आर्यनच्या अपहरणाचा डाव होता. मोहित हा मुंबई शहरात 12 हॉटेल चालवतो. समीर वानखेडे त्याचा चांगला मित्र आहे. मुंबईत ड्रग्जचा धंदा व्यवस्थित चालविण्यासाठी वानखेडे काम करत असल्याचा आोप त्यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT