मुंबई : क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात आर्यन खान अटक आणि सुटका याशिवाय मागच्या एका महिन्याच्या काळात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत. भाजप नेते मोहित कंबोज यांनी केलेल्या दाव्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते सुनिल पाटील हेच या संपुर्ण प्रकरणाचे मास्टरमाईंड आहेत. पण राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी कंबोज हेच या प्रकरणाचे मास्टरमाईंड असल्याचा आरोप केला आहे. आर्यनला क्रूझवर आणून अटक करण्याचा त्यांचाच प्लॅन होता. कंबोजही वानखेडे यांच्या प्रायव्हेट टीममधील असल्याचा खळबळजनक आरोप मलिक यांनी केला आहे.
मलिक यांनी रविवारी पत्रकार परिषद घेत कंबोज यांच्यासह वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सुनिल पाटील हा राष्ट्रवादीचा सदस्य नसल्याचे सांगत मलिक म्हणाले, क्रूझ ड्रग्ज प्रकरणात तीन लोकांना सोडण्यातच सर्वात मोठा खेळ होता. ऋषभ सचदेवा हाही त्यात होता. तो मोहित कंबोज यांचा भाचा आहे. कंबोज हे देशात भाजपची सत्ता बनण्याआधी काँग्रेस नेत्यांच्या मागे फिरत होते. 1100 कोटी रुपयांचा बँक घोटाळा करणारा हा व्यक्ती देशात सत्ताबदल होताच भाजपमध्ये गेले. पैशांच्या जोरावर युवा मोर्चाचे अध्यक्ष झाले. त्यांच्या घोटाळ्याची तक्रार सीबीआय व ईडीकडे होते. दीड वर्षांपूर्वी सीबीआयने छापेमारी केली होती. त्यानंतर हे प्रकरण दाबण्यात आले.
मागील एक महिन्यापासून कंबोज पूर्णपणे घाबरले आहेत. न्यायालयाच्या सुनावणीत सतत हा मुद्दा आला की, क्रुझवर आर्यन तो तिकीट काढून गेला नाही. प्रतिक गाबा व अमिर फर्निचरवालासोबत गेला. हे प्रकरण अपहरण व खंडणीचे आहे. मोहित कंबोजद्वारे ट्रॅप लावण्यात आला. आर्यन खानला तिथे पोहचवले होते. त्यानंतर अपहरण करून 25 कोटींच्या खंडणीचा खेळ सुरू झाला. डील 18 कोटींची झाली अन् 50 लाख घेतले. पण एका सेल्फीने खेळ बिघडवला, असे मलिक म्हणाले.
या अपहणाचा मास्टर माईंड कंबोज हे आहेत. वसुलीसाठी वानखेडे व कंबोज एकत्र आहेत. कंबोज यांची शहरात बारा हॉटेल आहेत. त्यांच्या एका हॉटेलशेजारी बॅस्किन हे हॉटेल होते. या हॉटेलच्या मालकावर खोटे गुन्हे दाखल केले. हॉटेल बंद होण्यासाठी हे करण्यात आले होते. हा सर्व वसूलीचा खेळ आहे. कंबोज हे वानखेडे यांच्या प्रायव्हेट आर्मीतीलच एक असल्याचा आरोप मलिकांनी केला. सहा तारखेला कंबोज व वानखेडे ओशिवरा स्मशानभूमीबाहेर भेटले होते. त्यांचं नशीब चांगलं मीटिंचा सीसीटीव्ही मिळाला नाही. माझा कुणीतरी पाठलाग करत आहे, अशी तक्रार वानखेडे यांनी त्यावेळी केली होती.
दरम्यान, मोहित कंबोज यांनी शनिवारी सुनील पाटील नामक व्यक्तीनेच क्रूझवरील ड्रग्ज पार्टीची लीड एनसीबीला दिली असल्याचा दावा केला आहे. ते म्हणाले, सॅम डिसूझा यांचा उल्लेख आजवर सर्वांनी केला. नवाब मलिक, संजय राऊत, प्रभाकर साईल या सगळ्यांनी त्यांचे नाव घेतले. पण सुनील पाटील यांनीच सॅम डिसूजाला १ तारखेला व्हॉट्सअॅप मेसेज, व्हॉट्सअॅप कॉल केला होता. त्यांनी सांगितले माझ्याकडे २७ लोकांची लीड आहे. क्रूजवर ड्रग्ज पार्टी होणार आहे. एनसीबीच्या अधिकाऱ्यांशी बोलणे करून दे. यानंतर सॅम डिसुजाने एनसीबी अधिकारी व्ही. व्ही. सिंह यांच्याशी बोलणे केले, आणि त्याबाबत सुनिल पाटीलला माहिती दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.