Ajit Pawar,Sharad Pawar, Eknath Shinde Sarkarnama
मुंबई

Sharad Pawar : "4 ते 6 महिन्यांत मोठी बातमी मिळणार..."; शरद पवार-अजितदादांच्या भेटीवर शिंदेंचा विश्वासू नेता नेमकं काय म्हणाला?

Ajit Pawar Meet Sharad Pawar :राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांना 85 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार गुरूवारी शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी दाखल झाले होते.

Jagdish Patil

New Delhi News: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांना 85 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार गुरूवारी शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी दाखल झाले होते.

राष्ट्रवादी पक्षाच्या फुटीपासून एकमेकांशी बोलणं टाळलेल्या या दोन नेत्यांच्या भेटीमुळे राज्यातील राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. अशातच या भेटीवर एकनाथ शिंदेंचे विश्वासू नेते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे. "पुढील चार ते सहा महिन्यांत मोठी बातमी मिळेल", असं शिरसाट यांनी म्हटलं आहे.

त्यांच्या या वक्तव्यामुळे आणखी चार महिन्यांनी राज्यात नवीन राजकीय समीकरण उदयाला येणार की काय? या चर्चांना सुरूवात झाली आहे. शिरसाट म्हणाले, "शरद पवारांना (Sharad Pawar) वाढदिवसाच्या शुभेच्छा पण त्यांना अजितदादा भेटले त्याचं आश्चर्य वाटत नाही. परंतु पण या दोघांमध्ये बंद दाराआड काय चर्चा झाली हे केवळ तेच सांगू शकतात.

मात्र, ते दोघं एकत्र आल्यास त्यांची ताकद वाढू शकते. चार ते सहा महिन्यांमध्ये तुम्हाला मोठी बातमी मिळेल, असं होऊ शकतं, असं सूचक विधान त्यांनी यावेळी केलं. तसंच, "राजकारण हा वेगळा भाग आहे आणि काकाचं नातं हा वेगळा भाग आहे. शिवाय पक्ष उभा करण्यामागे अजित पवार यांचाही शरद पवारांएवढाच सहभाग आहे.

ते दोघे एकत्र आल्यामुळे पक्षाची ताकद वाढू शकेल असं होऊ शकतं. ते शरद पवार आहेत, कुठला मास्टरस्ट्रोक मारतील हे कळणार नाही." मात्र, शरद पवार आणि अजितदादा काय निर्णय घेतील हे केवळ तेच सांगू शकतात. मात्र चार ते सहा महिन्यांमध्ये तुम्हाला मोठी बातमी मिळेल. कारण त्यांनी अनेकवेळा काँग्रेस (Congress) सोडली आणि जॉईन केली, अनेक पक्षांशी त्यांनी युती केली आहे.

ते काहीही करू शकतात. शरद पवार काय करतील ते बाजूच्या माणसाला कळत नाही, असंही शिरसाट म्हणाले. तसंच ते दोघे एकत्र आले तर आनंदच आहे. कॉम्प्रमाईज कसं करायचं आणि पुढे कसं जायचं हे शरद पवारांकडून शिकावं. शिवाय शरद पवार आणि अजित पवार (Ajit Pawar) एकत्र आले याचा फटका काँग्रेस आणि ठाकरे गटाला बसेल आम्हाला नाही, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT