Uddhav Thackeray, Devendra Fadnavis  Sarkarnama
मुंबई

Devendra Fadnavis News: '' मला तुरुंगात टाकण्याचा आघाडी सरकारचा डाव होता!''; फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट

Political News: ठाकरे यांनी माझ्यासाठी मातोश्रीचे दरवाजे बंद केले...

सरकारनामा ब्यूरो

Devendra Fadnavis On Uddhav Thackeray : महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यावर उध्दव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील कटुता वाढत गेली. दोघांकडूनही एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात होते. तसेच महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर पुन्हा शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आल्यावर हे दोघांमधील कटुतेत आणखी वाढ झाली.

पण आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उध्दव ठाकरेंसोबतच्या नात्यावर भाष्य करताना मोठं विधान केलं आहे. ठाकरे यांनी माझ्यासाठी मातोश्रीचे दरवाजे बंद केले असं विधान त्यांनी केले आहे.

देवेंद्र फडणवीस हे एबीपी माझाच्या कार्यक्रमात उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते. फडणवीस म्हणाले, पाच वर्ष एखाद्यासोबत सरकार चालवतो. कमीत कमी त्याचा फोन उचलणं आणि तुमचं जे काही ठरलंय,ते स्पष्टपणे सांगणं हे काम होतं. पण उध्दव ठाकरेंनी माझा फोन न उचलता स्वतः माझ्यासाठी मातोश्रीचे दरवाजे बंद केले याचं मला दु:खं आहे. हे कुणी केलं का केलं हे मला माहित नाही. पण मी कधीही राजकीय वैर देखील ठेवत नाही असं देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यावेळी म्हणाले.

फडणवीस म्हणाले, आघाडी सरकारच्या अडीच वर्षाच्या कालावधीत मला तुरुंगात टाकण्याचा डाव होता. माझ्यावर केसेस टाकण्याचा, माझ्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा, मला तुरुंगात टाकण्याचे टार्गेट मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त संजय पांडेंना देण्यात आले होते. कोणत्याही परिस्थितीमध्ये मला अटकवा असे आदेश महाविकास आघाडी सरकारच्या काळात पोलिसांना देण्यात आले होते. पण मी कोणतंही काम तसं न केल्यामुळे त्यांचा प्रयत्न सफल झाला नाही.

माझ्याकडून कुठलीही कटुता नाही. मी राजकीयदृष्ट्या त्यांचा विरोधक नक्की आहे. आणि अतिशय ताकदीनं मी त्या्ंचा विरोध देखील करेल. पण उध्दव ठाकरेंसोबत माझं कुठलंही वैर नाही. मी त्यांच्यासोबत चहा घेऊ शकतो. गप्पा मारु शकतो. एका कार्यक्रमात रश्मी वहिनी मला भेटल्या. त्यांच्याकडे उध्दवजींच्या तब्येतीची चौकशी केली. तसेच त्यांना उध्दवजींना माझा नमस्कार सांगा असंही म्हणालो. ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आहे. आणि त्याच्यापलीकडे मी कधीही जाणार नाही असंही फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT