मुंबई

MNS Vs BJP News : मुंबई - गोवा महामार्गावरून राजकारण तापलं; 'चमकोमॅन' उल्लेख करत 'या' मनसे नेत्याने मंत्री चव्हाणांंना डिवचलं

Mumbai - Goa Highway Issue : '' तुमचा खोटारडेपणा आणि अकार्यक्षमतेमुळे...''

Deepak Kulkarni

Mumbai : मुंबई - गोवा महामार्गावरून गेल्या काही दिवसांपासून आक्रमक पवित्रा घेत सरकारविरोधात रान उठवलं आहे. गेल्या १२-१३ वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना मैदानात उतरली आहे. मनसेने एकीकडे आंदोलनाच्या माध्यमातून महामार्गाचा हा मुद्दा धगधगता ठेवतानाच सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनाही लक्ष्य केले आहे.

यातच अभियंता दिनानिमित्त राज्य सरकारकडून मुंबई येथील षण्मुखानंद सभागृहात सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला मंत्री रवींद्र चव्हाण यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमात मनसेच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवून घोषणाबाजी केली. अशातच आता मनसे नेत्याने सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांना चमकोमॅन म्हणत मुंबई-गोवा महामार्गावरून हल्लाबोल केला आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांच्या आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण तापलं असतानाच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमेय खोपकर (Amey Khopkar)यांनी सरकारवर आगपाखड केली आहे. त्यांनी मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक कोडींचा एक व्हिडिओ शेअर करत सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.

या वेळी त्यांनी चव्हाण यांचा उल्लेख ‘चमकोमॅन’ असा केला आहे. तसेच अजूनही या चमकोमॅनवर भरोसा ठेवणार का? असा सवालही अमेय खोपकर यांनी विचारला आहे. फेसबुक पोस्ट करताना खोपकर यांनी मुंबई-गोवा महामार्गावरील ५ मिनिटांचा वाहूतक कोंडीचं दर्शन घडविणारा व्हिडिओ शेअर केला आहे.

मनसे नेते अमेय खोपकर नेमकं काय म्हणाले...?

मनसे नेते अमेय खोपकर यांनी याबाबतचा एक व्हिडिओ शेअर करत रवींद्र चव्हाण यांच्यावर टीका केली आहे. रवींद्र चव्हाण(Ravindra Chavan), धन्यवाद… तुमचा खोटारडेपणा आणि अकार्यक्षमतेमुळे मुंबई-गोवा महामार्गावर तब्बल १० किमीपेक्षा जास्त लांब रांगा लागल्या आहेत, अशा शब्दांत अमेय खोपकर यांनी रवींद्र चव्हाणांवर टीकास्र सोडलं आहे. अजूनही तुम्ही या ‘चमकोमॅन’वर भरवसा ठेवणार का? असा सवालही खोपकरांनी विचारला.

'' बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल... ''

गणेशोत्सवापूर्वी रस्त्याच्या एका मार्गिकेचे काम पूर्ण केले जाईल, असा दावा राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण करत असले तरी कामाची गती लक्षात घेता, यंदाही चाकरमान्यांचा कोकण प्रवास खडतर राहण्याची शक्यता अधिक आहे. याचवेळी आता मनसे(MNS) प्रवक्ते योगेश चिले यांनी मुंबई-गोवा महामार्गावरील वास्तव दाखवणारा व्हिडिओ शेअऱ केला आहे. या वेळी मनसेने बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांचा दावा खोडून काढला आहे. या वेळी त्यांनी बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल... अशी पोस्ट सोशल मीडियावर शेअऱ केली आहे.

तुम्ही म्हणाल सणासुदीचा काळ येतोय आणि तुम्ही असं का म्हणताय, तर या अशा पोकळ आश्वासनं देणाऱ्या राज्यकर्त्यांना हीच भाषा कळते. गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्गावरची एक मार्गिका (Single Lane) सुरू केली अशी आरोळी ठोकणारे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांचे दावे किती खोटे आहेत हे पाहा, असेही मनसेनं म्हटले आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT