Raj Thackeray Sarkarnama
मुंबई

'रमेश सोबतच्या संबंधाचा हा विषय, काविळ झालेल्यांना पिवळचं दिसतं!'

Raj Thackeray : राज ठाकरेंनी शिवसेनेला सुनावले.

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : अंधेरी पोटनिवडणूकीवरून आता वेगवेगळ्या घडोमोडी घडत आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतु़जा लटके यांच्या विरूद्ध भाजपने मुरजी पटेल यांना उमेदवारी दिली आहे. मात्र आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी विनंती केली आहे. राज ठाकरे यांनी आता आपल्या पत्रावर प्रतिक्रीया दिली आहे.

राज ठाकरे म्हणाले, दिवंगत आमदार रमेश लटके हा चांगला माणूस आपल्यातून गेला. त्यांच्या पत्नी जर समजा तेथून पोटनिवडणूकीत उभ्या आहेत, म्हणून मी फक्त फडणवीसांना विनंती केली. २०२४ ला विधानसभेची निवडणूक आहे, आपण कशाला आता या गोष्टी करत आहोत. राज्यात जी काही राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे, त्या पार्श्वभूमीवर एक चांगला संदेश आपण महाराष्ट्राला देवू. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे."

भाजप हा स्वतंत्र पक्ष आहे. तो पक्ष मी नाही चालवत, मी त्यांनी फार फार तर विनंती करू शकतो. दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या सोबत असलेल्या माझ्या संबंधाचा हा विषय होता. याच्या पलिकडे मी भारतीय जनता पक्षाच्या राजकारणात ढवळाढवळ करू शकत नाही. त्यामुळे प्रत्येक गोष्टीत मी भाजपला सल्ले देवू शकत नाही, असे राज ठाकरे म्हणाले.

दरम्यान भाजप नेत्यांच्या भेटीनंतर राज ठाकरेंचे पत्र आले आहे. ही भाजपची स्क्रिप्ट आहे, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाकडून केली गेली. यावर राज ठाकरे म्हणाले, त्यांना काय समजायचं आहे ते समजू द्या. एखाद्याला कावीळ झालं असेल तर जग पिवळं दिसतं. त्याला कोण काय करू शकत नाही. मी स्वच्छ मनाने काही गोष्टी सांगितले. घ्यायच्या तर घ्या, नाहीतर सोडून द्या. संपला विषय. मी थोडीच त्या ठिकाणी उमेदवार उभा करतोय, असे राज ठाकरे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT