राज ठाकरे, पवारांच्या अंधेरी बिनविरोधच्या भूमिकेनंतरही भाजप नेते म्हणतात ‘आमचं ठरलंय’!

राज ठाकरेंच्या पत्रानंतर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मागणीनंतर भारतीय जनता पक्ष काय भूमिका घेणार, याकडेच राज्याचे लक्ष लागले आहे.
Pravin Darekar-Sharad Pawar-Raj Thackeray
Pravin Darekar-Sharad Pawar-Raj ThackeraySarkarnama
Published on
Updated on

पंढरपूर : मुंबईतील अंधेरी (Andheri) पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीवरुन (by-elections) राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. कालपर्यंत भाजपच्या बाजूने री ओढणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज अचानक यू टर्न घेत अंधेरीची पोटनिवडणुक भाजपने लढवू नये, असे पत्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना लिहिल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. राज ठाकरेंनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनीही पत्रकार परिषद घेत ऋतुजा लटके यांना बिनविरोध निवडून देण्याचे आवाहन केले. (Pravin Darekar's clear indication of contesting Andheri by-elections)

राज ठाकरे, शरद पवार यांच्या मागणीवर भाजप नेत्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. यामध्ये भाजपचे नेेते आमदार प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी ‘आमचं ठरलंय’ असे म्हणत अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक भाजप लढवणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

Pravin Darekar-Sharad Pawar-Raj Thackeray
फडणवीसांच्या सूचनेनुसारच अभिजित पाटलांच्या नेतृत्वाखालील ‘विठ्ठल’ला मदत केली : दरेकर

आमदार प्रवीण दरेकर यांच्या हस्ते आज पंढरपूर येथील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या गाळप हंगामाचा प्रारंभ करण्यात आला. या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी राज ठाकरे यांनी लिहिल्या पत्रावर भाष्य केले. निवडणुका सहानभूतीवर लढवण्याचे दिवस संपले आहेत, आता विकासाच्या मुद्द्यावर लोक निवडून देतात. शिसेनेतून 50 आमदार बाहेर पडले तरी उध्दव ठाकरे यांना सहानभूती मिळाली का, असा प्रश्न करत उलट बाळासाहेबांच्या शिवसेना आमदारांचे राज्यात जंगी स्वागत होते आहे. लोक मोठ्या संख्येने पाठिंबा देतायत, असे म्हणत आमदार दरेकरांनी उध्दव ठाकरे यांच्यावर बोचरी टिका केली.

Pravin Darekar-Sharad Pawar-Raj Thackeray
शहाजीबापू पाटलांचा विधानसभेच्या मैदानातून पळ? विधान परिषदेवर पाठविण्यासाठी भाजप नेत्याला साकडे

राज ठाकरेंच्या पत्राविषयी विचारले असता, लोकशाहीत पत्र लिहिण्याचा, मत मांडण्याचा व व्यक्त करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. आमचा उमेदवार निवडून आणणं हे आमचं ध्येय आहे. त्यासाठी आम्ही उमेदवारी अर्ज भरला आहे. तेथील जनता निवडून देईल, असा आम्हाला विश्वास आहे. या उपर पक्ष म्हणून जो विचार करायचा असतो, तो आमचं नेतृत्व ठरवतं. आम्ही ठवत नाही, असेही दरेकर यांनी स्पष्ट केले.

Pravin Darekar-Sharad Pawar-Raj Thackeray
राज ठाकरेंच्या भेटीचे कारण खुद्द मुख्यमंत्री शिंदेंनीच सांगितले...

राज ठाकरेंच्या पत्रानंतर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मागणीनंतर भारतीय जनता पक्ष काय भूमिका घेणार, याकडेच राज्याचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com