Deepak Kesarkar Aditya Thackeray
Deepak Kesarkar Aditya Thackeray Sarkarnama
मुंबई

Deepak Kesarkar On Aditya Thackeray : केसरकरांनी सांगितल्या 'त्या' अपमानास्पद आठवणी; आदित्यांच्या भेटीसाठी धरावे लागायचे बॉडीगार्डचे पाय!

सरकारनामा ब्यूरो

Deepak Kesarkar On Aditya Thackeray : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेच्या नेते व राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नते आदित्य ठाकरेंसंबंधी काही खळबळजनक दावे केले आहेत. केसरकर म्हणाले, "मी एक ज्येष्ठ आमदार आहे, पण मला आदित्य ठाकरे यांना भेटायला त्यांच्या बॉडिगार्डचे मला पाय धरावे लागायचे, असा दावा केसरकरांनी केला.

केसरकर पुढे म्हणाले, "आतापर्यंत कंत्राटदारांच्या बैठका या मातोश्रीवर व्हायच्या, तुमच्यासाठी मुंबई कंत्राटाची खाण असेल.मेट्रोचे काम हे कोणामुळे बंद पडले हे जगजाहीर आहे.तुम्ही पर्यावरण मंत्री असताना हजारो कोटीचे स्टुडिओ सीआरझेड मध्ये कसे उभे राहिले? जर्मन कंपनीच्या व्यक्तीला मी मातोश्रीवर घेऊन गेलो होतो, उद्धव ठाकरे यांनी मला सांगितलं की या माणसाला घेऊन बीएमसी मध्ये घेऊन जा, असं सांगण्यात आलं."

केसरकर पुढे म्हणाले, "वरळीतून तुम्ही निवडून आलात, पण मतदारसंघात काय केलं तुम्ही? कोळी बांधवांना जो काही न्याय द्यायचा, तो आम्ही न्याय दिला. बाबासाहेबांचं नाव तुम्ही घेता, मात्र याआधी त्या नावाचा तुम्हाला त्रास होत होता. दलितांना तुम्ही काय दिलं? आम्ही 45 दलित वस्त्यांवर समाज मंदिरे उघडली, असा सवाल ही केसरकरांनी उपस्थित केला.

"लोकं पैशांनी विकायला गेले असते तर कधीच परिवर्तन झालं असतं. खोके मागायची सवय तुम्हाला आहे, हे मी जाहीरपणे सांगतो मी एक ज्येष्ठ आमदार आहे, पण मला आदित्य ठाकरे यांना भेटायला त्यांच्या बॉडिगार्डचे पाय धरावे लागायचे. बॉडीगार्ड सांगायचे की, मुंबईत आहेत की बाहेर आहेत. आदित्य ठाकरे यांनी आता सीमा ओलांडल्या आहेत. त्यामुळे मला बोलावं लागतंनाहीतर मी कधीच ठाकरे परिवारावर बोलत नाही, तुम्ही असंच बोलत जाणार असाल, तर तुम्ही अधिक खोलात जाल, असा ही इशारा केसरकारांनी दिला.

(BY- Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT