Jayant Patil News Sarkarnama
मुंबई

Jayant Patil News: मंत्रीपदाची शपथ घेतलेल्यांना कायदेशीर अडचणींना सामोरं जावं लागणार; जयंत पाटलांचा थेट इशारा

NCP : "आज मंत्रीपदाची शपथ घेतली त्यांनीच राष्ट्रवादी पक्षाच्या विरोधी जावून भूमिका घेतली"

सरकारनामा ब्यूरो

Political : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामिल होत पुन्हा एकदा राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर अजित पवार यांच्याबरोबर छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे यांच्यासह अजून काही नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. या सर्व घडामोडीनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाष्य केलं आहे.

यावेळी शिंदे-फडणवीस सरकारला राष्ट्रवादीचा पाठिंबा नाही, अशी थेट भूमिका जयंत पाटील यांनी जाहीर केली. याबाबत येत्या 5 जुलैला शरद पवार सविस्तर भूमिका मांडणार आहेत. राष्ट्रवादी पक्षाचा शिंदे-भाजपला पाठिंबा नाही. पाठिंबा नसताना देखील काही सहकाऱ्यांनी भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा दिला. त्यामुळे त्यांना कायदेशीर काही अडचणी आल्या तर त्यांना त्याला तोंड द्यावे लागेल", असा थेट इशारा जयंत पाटलांनी यावेळी दिला.

जयंत पाटील नेमकं काय म्हणाले?

"सत्तेत असणाऱ्या पक्षाने पुन्हा एकदा आणखी एक पक्ष फोडण्याच काम केलं आहे. वाटेल त्या पद्धतीने सध्या फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे. मात्र, जनता शरद पवार यांच्या मागे खंबीरपणे उभा राहिल. याचा आम्हाला विश्वास आहे", असं ते म्हणाले.

राष्ट्रवादीतून बंड करत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामिल झालेले अजित पवारांसह अजून काही नेते यांच्याबाबतीत पक्ष काही कारवाई करणार का? या प्रश्नावर जयंत पाटील म्हणाले, "आम्ही कारवाईच्या बाबातीत अजून अभ्यास केलेला नाही. मात्र, आम्ही योग्य ती पाऊलं टाकणार आहोत. ज्या सहकाऱ्यांनी आज मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांनीच राष्ट्रवादी पक्षाच्या विरोधी जावून भूमिका घेतलेली आहे. पण मी बाकीच्या आमदारांना दोष देणार नाही", असं म्हणत मंत्रीपदाची शपथ घेतलेल्यांना जयंत पाटलांनी एक प्रकारे थेट इशारा दिला.

राष्ट्रवादी पक्षाचा शिंदे-भाजपला पाठिंबा नाही. पाठिंबा नसतानाही काही सहकाऱ्यांनी भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा दिला, त्यामुळे कायदेशीर काही अडचणी आल्या तर त्यांना त्याला तोंड द्यावे लागेल", असंही ते यावेळी म्हणाले.

Edited By : Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT