NCP News : राज्यभरातील कार्यकर्त्यांत संभ्रम, `काका`कडे जावे की `पुतण्या`कडे!

अजित पवार यांनी खरी राष्ट्रवादी माझीच हा दावा केल्याने कार्यकर्ते संभ्रमात पडले
Sharad Pawar & Ajit Pawar
Sharad Pawar & Ajit Pawar Sarkarnama
Published on
Updated on

NCP Split in Maharashtra : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आज अजित पवार यांनी फूट पाडली. त्यांनी एकनाथ शिंदे, भाजप सरकारला पाठींबा दिला. या निर्णयाला शरद पवार यांचा पाठींबा नाही. त्यामुळे आता राज्यभरातील कार्यकर्ते, नेत्यांत गोंधळ आहे. `काकांकडे जावे की पुतण्याकडे जावे` असा संभ्रम त्यांच्यापुढे आहे. (NCP party workers are in confusion where to go, With Uncle or nephew)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) आज फूट पडली. बहुतांश आमदारांनी राज्यातील एकनाथ शिंदे (Eknath Shinde) भाजपच्या (BJP) सरकारला पाठींबा दिला आहे. त्यामुळे शरद पवार (Sharad Pawar) यांनी ही पक्षाची भूमिका स्पष्ट नसल्याचे स्पष्ट केले आहे.

Sharad Pawar & Ajit Pawar
Sharad Pawar on Ajit Pawar: अजित पवारांची बैठक; प्रदेशाध्यक्षपदाच्या चर्चांवर शरद पवार स्पष्टचं बोलले...

राष्ट्रवादी काँग्रेसचे जे आमदार अजित पवार यांच्यासमवेत गेले आहेत, तीथे काही मतदारसंघात या आमदारांच्या समर्थकांनी आनंदोत्सव साजरा केला. गुलाल उधळला. मात्र त्यात पक्षाचे कार्यकर्ते, नेते, पदाधिकारी किती याबाबत स्पष्टता नसल्याच्या बातम्या आहेत.

प्रत्येक आमदाराचे व्यक्तीगत अनुयायी, समर्थक, कंत्राटदारअशी मतदारसंघात यंत्रणा असते. ही यंत्रणा त्यांची वैयक्तीक असते. तीचा पक्षाशी काहीही संबंध नसतो. पक्षाचे कार्यकर्ते, अनुयायी, समर्थक हे मात्र वेगळे असतात. आता पक्षात फूट पड़ल्याने यातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते कुठे जावे या संभ्रमात सापडले आहेत. अनेकांना मतदारसंघ, भावी योजना, आमदारांकडे असलेली कामे, तसेच पक्षातील पदे यांचा विचार करता काकांकडे जावे की पुतण्याकडे असा प्रश्न पडलेला जाणवतो. यामध्ये अनेक पदाधिकारी या घरच्या गोंधळात राजकारणापासून काही दिवस अलिप्त रहावे या मनस्थितीत आहेत.

Sharad Pawar & Ajit Pawar
Ajit Pawar New DCM : अजितदादांसोबत छगन भुजबळही मंत्रिपदाची शपथ घेणार; पवारांचे निकटवर्तीय पटेल, वळसे पाटीलही राजभवनावर

राष्ट्रवादीच्या पस्तीस आमदारांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला पाठींबा देण्याच्या पत्रावर सह्या केल्याचे कळते. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसची यंत्रणा जवळपास दिडशेहून अधिक मतदारसंघात कार्यरत आहे.या मतदारसंघात आमदार नाहीत, अशी बहुतांश मंडळी शरद पवार यांच्यासोबत असल्याचे संदेश येत आहेत. मात्र सत्तेचा एक प्रभाव असतो. सध्या सत्तेत अजित पवार आहेत. त्यामुळे काका की पुतण्या हा संभ्रम कायम असल्याचे दिसून आले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com