Ganesh Naik
Ganesh Naik Sarkarnama
मुंबई

Video Ganesh Naik : राज्यासाठी शिंदे मुख्यमंत्री; पण आमच्यासाठी फडणवीसच 'लीडर'! गणेश नाईक नेमके काय म्हणाले?

Sunil Balasaheb Dhumal

Mumbai BJP Politics : लोकसभा निवडणुकीत र ज्यात भाजपने मिशन ४५ ठरवले होते. प्रत्यक्षात मात्र महायुतीची धूळधाण झाली. त्यानंतर घटक पक्षांनी उघडपणे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले.

आता कुठे ते वातावरण निवळत असताना भाजप आमदार गणेश नाईकांनी राज्यासाठी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतील, पण आमच्यासाठी देवेंद्र फडणीवसच लिडर असल्याचे सूचक विधान केले.

लोकसभेत महायुतीला मोठा धक्का बसला आहे. त्यातल्या त्यात भाजपवर तर 28 पैकी फक्त 9 जागा मिळाल्याने मोठी नामुष्कीची वेळ आली आहे. यातून घटक पक्षांत आमच्या उमेदवारांचे काम केले नसल्याचा सूर उमटू लागले.

त्यानंतर भाजपचा शनिवारी ठाण्यात मेळावा पार पडला. यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीसांच्या Devendra Fadnavis उपस्थितीतच गणेश नाईकांनी आमच्यासाठी फडणवीसच मोठे असल्याचे विधान केले. यामुळे राजकीय वर्तुळातून भुवया उंचावल्या आहेत.

गणेश नाईक नेमके काय म्हणाले ?

विधानसपरिषद आणि आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विजय मिळवणार, असा विश्वास आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे माननीय आहेत. पण आमच्यासाठी देवेंद्र फडणवीस हेच लीडर आहेत.

मी तर ओपन बोलतो, प्रोटोकॉल म्हणून एकनाथ शिंदे या राज्याचे प्रमुख आहेत, पण भाजपच्या अनुषंगाने, देवेंद्र फडणवीस यांच्या अनुषंगानेच कारभार चालतो, असेही नाईक Ganesh Naik म्हणाले आहेत.

मनसेचे कौतुक

मनसे शिस्त बद्द पक्ष आहे. डोलारा कितीही मोठा असला तरी मनसे ही शिस्त बद्द पक्ष आहे. विधानपरिषदेत अभिजित पानसे यांनी उमेदवारी मागे घेतली. ते मात्र योग्य वेळी पुढे येणार आहेत. आता कोकण पदवीधरमधून निरंजन डावखरे रिंगणात आहेत. मोठ्या लोकांकडून कधी-कधी छोट्या चुका होत असतात. ठाण्यात 33 टक्के मतदार आहेत. मात्र तुम्ही व्यवस्थित, काळजीपूर्वक मतदान करा, असेही आवाहन नाईकांनी केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT