Uddhav Thackeray and Eknath Shinde Sarkarnama
मुंबई

Thackeray vs Shinde : ठाकरे गटातील गळती सुरूच; तीन माजी नगरसेवक शिंदे गटात, "आत्तापर्यंत ३६ माजी नगरसेवक शिंदे गटात...

Maharashtra Politics : प्रभागातील रखडलेली विकासकामे पूर्ण करण्यासाठी नक्की विकासनिधी देण्यात येईल, मुख्यमंत्र्यांचे आश्वासन...

Mangesh Mahale

Mumbai : शिवसेनेत बंडखोरी झाल्यापासून ठाकरे गटात गळती सुरूच आहे. ठाकरे गटातील जोगेश्वरी येथील तीन माजी नगरसेवकांनी शिंदे गटात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित प्रवेश केला.

मुंबईत आतापर्यंत उबाठा गटाच्या 33 माजी नगरसेवकांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला असून, आता ही संख्या 36 झाली आहे. जोगेश्वरीमधील प्रभाग ७३ चे माजी नगरसेवक प्रवीण शिंदे, माजी नगरसेविका प्रतिमा खोपडे आणि प्रभाग क्रमांक ८८च्या माजी नगरसेविका स्नेहल शिंदे यांनी मंगळवारी शिंदे गटात प्रवेश केला आहे. शिवसेना नेते, खासदार गजानन कीर्तीकर उपस्थित होते.

या वेळी जोगेश्वरी, विलेपार्ले परिसरातील काही पदाधिकाऱ्यांनीही प्रवेश केला आहे. या सगळ्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वागत केले असून, पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, "महायुती सरकार सत्तेत आल्यापासून मुंबईत अनेक विकासकामे वेगाने सुरू झाली आहेत. त्यामुळे या आंतरराष्ट्रीय शहराला खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय शहर बनवण्याचा प्रयत्न सुरू झाला असल्याचे सांगितले. मुंबईतील रखडलेल्या इमारतींचा पूर्णविकासाला गती देऊन मुंबईतून बाहेर गेलेला मराठी माणूस पुन्हा मुंबईत घेऊन येणार आहे,"

"ज्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला, त्यांना त्यांच्या प्रभागातील रखडलेली विकासकामे पूर्ण करण्यासाठी नक्की विकासनिधी देण्यात येईल, लोकांना सोयीसुविधा पुरवण्यासाठी निधीची कमतरता जाणवणार नाही," असे मुख्यमंत्री म्हणाले. सरकारच्या निर्णयक्षमतेकडे आकर्षित होऊन फक्त मुंबईच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक जण शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT