Jaidatta Kshirsagar News: निधी आमचा, नारळ भलतेच फोडतात; जयदत्त अण्णांनी पुतण्यांवर फेकल्या करवंट्या...

Beed Politics : जयदत्त क्षीरसागर यांनी आपले चिरंजीव रोहित क्षीरसागर यांना मैदानात आणले आहे.
Jaydutt Kshirsagar  News
Jaydutt Kshirsagar NewsSarkarnama
Published on
Updated on

Beed : सत्तेत असो किंवा नसो मात्र केंद्रात आणि राज्य सरकारमध्ये आपले मित्रत्वाचे संबंध असल्याने बीड शहरासह मतदारसंघातील विकासकामांसाठी आम्ही विकास निधी खेचून आणतो. मात्र, फोटो काढून सोशल मीडियात टाकून नारळ फोडण्याची सध्या चढओढ सुरू असून, वाढपेच भाव खातात, अशी परिस्थिती सध्या बीडमध्ये असल्याची फटकेबाजी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केली.

दुसरे पुतणे सोडून गेल्यानंतर जयदत्त क्षीरसागर यांनी आपले चिरंजीव रोहित क्षीरसागर यांना मैदानात आणले आहे. गणेशोत्सवात आरत्यांच्या निमित्ताने क्षीरसागर पिता-पुत्र विविध मंडळांना भेटी देत आहेत. या वेळी त्यांनी नागरिकांशी संवाद साधताना नावे न घेता दोन्ही पुतण्यांवर टोलेबाजी केली.

Jaydutt Kshirsagar  News
Dhangar Reservation News : धनगर समाजाचे आंदोलन फक्त स्थगित; निर्णय न घेतल्यास सरकार विरोधात राज्यभर रान उठवणार...

जयदत्त क्षीरसागर म्हणाले, "बीड शहरातील विविध विकासकामांचे आपण साक्षीदार आहोत. उर्वरित कामांसाठीही आपण निधी आणू. जरी मी सत्तेत असलो किंवा नसलो तरी केंद्र आणि राज्य सरकारमध्ये मित्रत्वाचे संबंध असल्याने त्या माध्यमातून आपण शहराच्या विकासासाठी निधी आणतो. आत्तापर्यंत गेल्या सहा वर्षांमध्ये साधारण 450 कोटी रुपये शहराच्या रस्त्यासाठी आणि पिण्याच्या पाण्याच्या योजनेकरिता मिळविल्याचा दावाही जयदत्त क्षीरसागर यांनी केला.

लहान मुले आणि महिलांसाठी दोनशे खाटांचे सुसज्ज आशा नवीन हॉस्पिटलचे बांधकाम पूर्ण झालं. येत्या दीड दोन महिन्यांत त्याचा प्रारंभ होईल. बीड हे जिल्ह्याचे ठिकाण असून, येथील बस स्थानक भव्य दिव्य असायला पाहिजे. मात्र, त्याची काय अवस्था झाली. हे आपण पाहत आहात. परंतु ज्यांच्या हाती सत्ता आहे, त्यांनी याकडे ढुंकूनही पाहिले नाही, हे दुर्दैव आहे. आपण निधी आणला. मात्र, वाढप्यांनी त्यांची पंगत असल्याप्रमाणे सुरू केल्याचे जयदत्त क्षीरसागर म्हणाले. विकासाचा वारसा पुढे चालवू. तुमची साथ तुमची ताकद तुमचा आशीर्वादाची कवचकुंडल आम्हाला मिळत राहिली तर विकास आणखी वेगाने करू. ताकदीने नगर परिषद, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मजबुतीने लढवू, असे ते म्हणाले.

Edited By : Mangesh Mahale

Jaydutt Kshirsagar  News
MP BJP Candidates List: मध्य प्रदेशात तीन केंद्रीय मंत्र्यांसह सात खासदार विधानसभेच्या रिंगणात; भाजपकडून दुसरी यादी जाहीर

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com