NCP leader Jitendra Awhad  Sarkarnama
मुंबई

Thane Politics : तीन वेळा नगरसेवक तरी नाव गायब, कोणाकडे दाद मागणार? जितेंद्र आव्हाड आक्रमक

Sudhir Bhagat Jitendra Awhad : तीन वेळा नगरसेवक राहिलेल्या सुधीर भगत यांचे नाव मतदारयादीतून गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणी निवडणूक आयोगावर टीका केली आहे.

सरकारनामा ब्यूरो

राहुल क्षीरसागर

Jitendra Awhad News : ठाणे महापालिकेत तब्बल तीन वेळा नगरसेवक राहिलेले सुधीर भगत यांचे नाव मतदारयादीतून गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सुधीर भगत यांच्या वडिलांच्या नावाने "रामचंद्र नगर " नावाचे एक नगरच आहे. मात्र, सुधीर यांनी आगामी महापालिका निवडणूक लढू नये, यासाठी हा प्रकार करण्यात आल्याचा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक्स अकाऊंटवरून केला आहे.

आव्हाड म्हणाले की, 'सुधीर रामचंद्र भगत हे निवडणूक लढविणार हे जवळपास निश्चित आहे. त्यामुळेच या प्रबळ उमेदवाराला निवडणुकीपासून वंचित ठेवण्यासाठी निवडणूक अधिकारी - कर्मचारी यांना हाताशी धरून सुधीर भगत यांचे नाव मतदारयादीतून काढण्याची प्रक्रिया करण्यात आली अन् पकडली गेली.'

'जिल्ह्याचे जिल्हाधिकारी की जे मुख्य जिल्हा निवडणूक अधिकारी आहेत; त्यांच्याकडे तक्रारअर्ज केल्यानंतर ते त्यांच्या निकालात म्हणतात की, ' अनवधानाने, चुकीचे आमच्या अधिकारी - कर्मचाऱ्यांकडून गफलत झाली आणि तुमचे नाव वगळण्यात आले. त्यामुळे तुमचे नाव यादीत आणतो. पण, तुम्ही मतदान करू शकणार नाही तसेच तुम्ही निवडणूकही लढवू शकणार नाही. कारण १ जुलैपूर्वी तुमचे नाव मी टाकू शकत नाही. तसेच योग्य त्या प्राधिकरणाकडे अपिल करू शकता.', असे आव्हाड यांनी सांगितले.

'जिल्हाधिकारी आपल्या निकालात सांगतात. आता योग्य ते प्राधिकरण आम्ही कुठे शोधावे? ही शोधाशोध कुणी करायची आणि का करायची? निवडणूक आयोगाच्या यंत्रणेने केलेल्या गडबड घोटाळ्याचा त्रास नागरिकांनी का सहन करावा? जिल्हाधिकारी तथा मुख्य जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी दिलेल्या या निकालाला खरोखरच काही अर्थ आहे का?' असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.

अ‍ॅफिडेव्हीट द्यायला तयार...

हीच व्होटचोरी आहे अन् ही व्होटचोरी जागोजागी केली जाते. खोटी नावे आणली जातात, खरी नावे काढली जातात, हे आम्ही पुराव्यानिशी सांगत होतो. आता निवडणूक आयोगाने सांगावे की, कुठे अॅफिडेव्हीट द्यायचे? याचे अॅफिडेव्हीट द्यायला मी तयार आहे. तुम्हाला राहुल गांधी यांच्याकडून अॅफिडेव्हीट हवे होते ना, मी स्वतः या प्रकरणावर अॅफिडेव्हीट द्यायला तयार आहे; तेही पुराव्यासह ! असे देखील आव्हाड यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT