Tapovan Tree Cutting Controversy : 'वृक्षतोड हा धर्माचा विषय नाही, टिल्लू-स्तराची बुद्धी असलेल्याला...'; ठाकरेंच्या नेत्याने नितेश राणेंची अक्कलच काढली

Nitesh Rane Statement on Tapovan Tree Cutting : तपोवन येथील वृक्षतोड प्रकरणावर भाजप नेते व मंत्री नितेश राणे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. 'तपोवनमधल्या वृक्षतोडची चिंता करणारे पर्यावरणवादी कधीच. ईदच्या वेळी बकरी कापण्याला विरोध करताना दिसत नाहीत. तेव्हा गप्प का? सर्व धर्म सम भाव?' असं ट्विट राणे यांनी केलं.
Nitesh Rane, Uddhav Thackeray
Environmental activists protest against the Tapovan tree cutting plan in Nashik as political reactions intensifySarkarnama
Published on
Updated on

Nitesh News, 05 Dec : नाशिक येथील आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी सूरू आहे. यासाठी तपोवन परिसरातील 1800 झाडे कापली जाणार आहेत. मात्र ही वृक्षतोडीला नाशिककरांनी तीव्र विरोध केला आहे.

शिवाय राज्यभरातील पर्यावरून प्रेमींनी देखील सरकारच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त करत, हा निर्णय रद्द करण्याची मागणी केली आहे. मात्र, सरकारमधील काही मंत्री वृक्षतोड करण्यावर ठाम असल्याचं पाहायला मिळत आहे.

अशातच तपोवन येथील वृक्षतोड प्रकरणावर भाजप नेते व मंत्री नितेश राणे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. 'तपोवनमधल्या वृक्षतोडची चिंता करणारे पर्यावरणवादी कधीच. ईदच्या वेळी बकरी कापण्याला विरोध करताना दिसत नाहीत. तेव्हा गप्प का? सर्व धर्म सम भाव?' असं ट्विट राणे यांनी केलं.

Nitesh Rane, Uddhav Thackeray
Shivsena UBT : 'केंद्रीय कृषिमंत्र्यांमुळे महायुतीचं पितळ उघडं पडलं, निवडणुकांसाठी पायाला भिंगरी लावून फिरले, पण शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईबाबत...'

त्यांच्या याच ट्विटवरून ठाकरेंच्या शिवसेनेने सडकून टीका केली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे राज्य संघटक अखिल चित्रे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत राणेंना डिवचलं आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलं की, 'वृक्षतोड हा पर्यावरणाचा विषय आहे धर्माचा नाही. टिल्लू-स्तराची बुद्धी असलेल्याला वृक्षतोडसारखा गंभीर विषय कुठून समजणार?

Nitesh Rane, Uddhav Thackeray
Online 7-12 : चिरीमिरीशिवाय मिळणार सात-बाराचा उतारा; तलाठ्याकडे जाण्याची गरज नाही : महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

टिल्लू-लेव्हल बुद्धीत वृक्षतोड बसणार तरी कुठे? त्याच्या सिस्टीममध्ये तर हिंदू-मुस्लीम बकरा-कोंबडीच फिरतात, वृक्षतोडची फाईल तर ‘unsupported format’ म्हणूनच उघडत नाही.', अशा शब्दात त्यांनी नितेश राणेंना टोला लगावला आहे. त्यामुळे आता नितेश राणे ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अखिल चित्रे यांच्या टीकेला उत्तर देणार का ? हे पाहणं महत्वांचं ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com