Jitendra Avhad on Raj Thackeray, Jitendra Avhad News
Jitendra Avhad on Raj Thackeray, Jitendra Avhad News Sarkarnama
मुंबई

टिळकांनी एकही वीट रायगडावर नेला नव्हती; चुकीचा इतिहास सांगू नका

सरकारनामा ब्युरो

मुंबई : बाळ गंगाधर टिळकांनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली, असे मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी चुकीचे सांगितल्याचा दावा गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड ( Jitendra Awhad ) यांनी केला. इतिरासाशी खेळू नका, असा इशाराही त्यांनी राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांना दिला. ( Tilak did not take a single brick to Raigad; Don't tell the wrong story )

जितेंद्र आव्हाड म्हणाले, पेशव्यांनी कधीही समाधीकडे समाधीकडे पाहिले नाही. 1818 साली इंग्रजांची सत्ता आली त्यांनी रायगडावर जाणारे सर्व वाटा अडविल्या. 1869 साली महात्मा ज्योतीबा फुले हे रायगडावर गेले. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीवरील वेली, झाडे, झुडपे बाजूला करून ती समाधी शोधली ती समाधी स्वच्छ केली. त्याचा उल्लेख फुलेंच्या साहित्य व पत्रव्यवहारात आढळतो. तसेच `दिनबंधू` नियतकालिकात याचा उल्लेख आहे. त्यानंतर फुलेंनी पुण्यात येऊन सभा घेतली. या सभेला करवीर संस्थानचे आबासाहेब घाडगे उपस्थित होते. आबासाहेब घाडगे यांनी रायगडावर अभियंते पाठविले. सहा महिन्यांनी आबासाहेब घाडगे व पाठोपाठ फुले यांचेही निधन झाले. (Jitendra Avhad on Raj Thackeray)

ते पुढे म्हणाले की, 1895 साली टिळकांनी समाधी तयार करण्याची मोहीम हाती घेतली. त्यांनी घाडगे, भोसले, निंबाळकर आदी संस्थानिकांच्या गाठीभेटी घेतल्या. आपण सर्व मिळून समाधी बांधू असा निर्णय घेतला व टिळकांनी पैसे कमवायला सुरवात केली. टिळक केवळ दोन वेळा रायगडावर गेले, असे इतिहासात नमूद आहे. त्यांना शिवाजी महाराजांचे छायाचित्र न सापडल्याने त्यांनी शिवाजी महाराजांच्या सिंहासनाजवळ नाना फडणवीसांचे छायाचित्र ठेवले. त्यांचा मृत्यू 1920 साली झाला. तोपर्यंत समाधीसाठी कोणतेही काम झाले नव्हते. टिळकांनी समाधीसाठी वर्णणी काढून जमा केलेले पैसे डेक्कन बँकेत ठेवले होते. नंतर त्यांनी डेक्कन बँक बुडाली, असे जाहीर केले. त्यानंतर 1926 मध्ये टिळकांनी स्थापन केलेल्या समाधी जिर्णोद्धार समितीशी ब्रिटिशांनी चर्चा केली. कारण ब्रिटिशांवर शिवप्रेमींचा समाधी बांधावी असा दबाव होता. इंग्रजांनी समितीला बरोबर घेत स्वतःचे अभियंते पाठवून 1927 मध्ये समाधी बांधली. तो पर्यंत शंकरराव मोरे व भास्करराव जाधव यांनी शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ शोधून त्याचा जीर्णोद्धार केला, असे मंत्री आव्हाड यांनी स्पष्ट केले.

इतिहास हा आकलनातून येतो. त्यावर वादविवाद करायला मी तयार आहे. संदर्भाच्या आधारे इतिहास लिहिला जातो. कोणाच्या नावावर तो खपविला जात नाही. टिळकांनी एकही वीट रायगडावर नेली नव्हती. शिवाजी महाराजांच्या समाधीशी संबंध नाही. चुकीचा इतिहास सांगून महाराष्ट्राचे वाटोळे केले. इतिहास बोलका असतो तो मनावर परिणाम करणारा असतो. यशवंतराव चव्हाणांनी पुरंदरेंना थांबविण्याचा प्रयत्न केला होता. त्यात ते यशस्वी झाले असते तर आता जो गोंधळ दिसतो तो दिसला नसता. इतिहासाशी खेळू नका. त्यातून वेगळेवाद निर्माण होतील. ते महाराष्ट्राला महागात पडतील. राजकारणात असलेल्यानी महागाई, बेरोजगारी, नागरी समस्यांवर बोलावे.

नास्तिक शब्दाचा अर्थ संस्कृत वाड्मयात माधव आचार्य नावाच्या विद्वानाने सांगितला आहे. वेद नाकारतो त्याला नास्तिक म्हणतात. ईश्वर नाकारतो त्याला निरेश्वरवादी म्हणतात, असा टोलाही मंत्री आव्हाड यांनी लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT