gram-panchayat cartoon sarkarnama
मुंबई

Gram Panchayat Election 2022 : आज 547 ग्रामपंचायतींना गावकारभारी मिळणार

Gram Panchayat Election 2022 : पहिल्यांदाच थेट जनतेमधून सरपंच निवडला जाणार असल्याने ही निवडणूक वेगळी ठरली.

सरकारनामा ब्युरो

पुणे : राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर प्रथमच ग्रामपंचायत निवडणुका होत आहेत. रविवारी मतदान झालं. आज (सोमवारी) सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणीस प्रारंभ होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेचा कौल काय आहे हे या निकालानंतर कळण्यास मदत होणार आहे. (Maharashtra Gram Panchayat Election Results 2022)

16 जिल्ह्यांपैकी 608 ग्रामपंचायत आणि थेट सरपंच पद निवडीसाठीही रविवारी मतदान झाले. त्यापैकी 547 ग्रामपंचायतीचा आज निकाल आहे. त्यातही जवळपास 51 ग्रामपंचायती आगोदरच बिनविरोध झाल्या आहेत.

पहिल्यांदाच थेट जनतेमधून सरपंच निवडला जाणार असल्याने ही निवडणूक वेगळी ठरली. ग्रामपंचायत निवडणुकांसाठी रविवारी विविध जिल्ह्यांमध्ये अगदी शांततेत मतदान पार पडले. त्यामुळे आज येणाऱ्या निकालानंतर विजयी उमेदवार कोण असणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे.

रविवारी झालेल्या 547 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांत प्राथमिक अंदाजानुसार सरासरी सुमारे 76 टक्के मतदान झाल्याची माहिती आहे. सांयकाळपर्यंत सर्व जागांवरील चित्र स्पष्ट होतील.

कोणत्या तालुक्यात किती ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक झाली याची जिल्हा आणि तालुकानिहाय संख्या

पुणे

जुन्नर- 38,

आंबेगाव- 18

खेड- 05

भोर- 02

जळगाव

चोपडा- 11 आणि यावल- 02

बुलढाणा

जळगाव (जामोद)- 01

संग्रामपूर- 01

नांदुरा- 01

चिखली- 03

लोणार- 02

अकोला

अकोट- 07

बाळापूर- 01

वाशीम

कारंजा- 04

नंदुरबार

शहादा- 74

नंदुरबार- 75

धुळे

शिरपूर- 33

अमरावती

धारणी- 01

तिवसा- 04

अमरावती- 01

चांदुर रेल्वे- 01

यवतमाळ

बाभुळगाव- 02, कळंब- 02,

यवतमाळ- 03, महागाव- 01,

आर्णी- 04, घाटंजी- 06,

केळापूर- 25, राळेगाव- 11,

मोरेगाव- 11 आणि झरी जामणी- 08

नांदेड

माहूर- 24, किनवट- 47,

अर्धापूर- 01, मुदखेड- 03, नायगाव (खैरगाव)- 04,

लोहा- 05, कंधार- 04, मुखेड- 05, आणि देगलूर- 01

हिंगोली

(औंढा नागनाथ)- 06.

परभणी

जिंतूर- 01

पालम- 04

नाशिक

कळवण- 22,

दिंडोरी- 50

नाशिक- 17

अहमदनगर

अकोले- 45

लातूर

अहमदपूर- 01

सातारा

वाई- 01

सातारा- 08

कोल्हापूर

कागल- 01

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT