मुंबई : शिंदे गटात गेलेले आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांना मोठा दिलासा नुकताच मिळाला आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हा अन्वेषण विभागाने टॉप सिक्युरिटी घोटाळा प्रकरणामध्ये कोर्टात क्लोजर रिपोर्ट सादर केला. (Uddhav Thackeray latest news)
आता ईडीदेखील याच अहवालाच्या आधारे क्लोजर रिपोर्ट सादर करणार असल्याची चर्चा सुरु आहे. तपासात प्रगती होत नसल्याने क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आला आहे. यावरुन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांनी सरनाईक यांच्यावर निशाणा साधला आहे.
शिवसेनेत बंड करुन शिंदे गटात गेलेले बंडखोर आमदार प्रताप सरनाईक यांच्यावरील ईडीची केस मागे घेण्याची तयारी सुरू आहे. त्यासाठी क्लोजर रिपोर्ट सादर केला गेला. त्याचा दाखला देत उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर सणसणीत टीका केली.
ठाकरे म्हणाले, "संयुक्त महाराष्ट्र चळवळीत मराठी माणसाने मुंबई मिळवली. पण बेळगाव, कारवार, निपाणीचा भाग तसाच राहिला आहे. गेली काही वर्षे ही केस सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. पण प्रताप सरनाईकवरील केस तातडीने मागे घेतली जात आहे. कारण त्यांनी पक्षांतर केले आहे. लॉण्ड्रीमध्ये आले आहेत. वेळेत कपडे धुऊन दिले पाहिजेत म्हणून की, ही केस लोकशाहीपेक्षा मोठी आहे म्हणून मागे घ्यायची घाई सरकार करत आहे,"
सरनाईक यांची ईडी चौकशी बंद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे सरनाईकांविरोधात गेली काही महिने आवाज उठविणारे भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी याप्रकरणावर बोलण्यास नकार दिला आहे. 'मला यावर काही बोलायचं नाही', असं त्यांनी म्हटलंय. म्हणजेच शिंदे गटात गेल्यावर सरनाईकांच्या पाठीमागचं ईडीचं शुक्लकाष्टही संपण्याची चिन्हं आहेत तसेच सोमय्यांच्या आरोपांच्या फैरीही थांबल्या आहेत.
सरनाईक यांच्यासंबंधित न्यायालयाने सी समरी अहवाल स्वीकारल्याने मूळ गुन्हा रद्द झाला आहे. त्यामुळे पीएमएलए अंतर्गत ईडीने दाखल केलेला गुन्हा टिकू शकत नाही. त्यामुळे कित्येक महिन्यांपासून सुरु असलेल्या ईडीच्या चौकशीच्या फेऱ्यातून सरनाईक यांची सुटका होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.