IAS Officers Transfer In Maharashtra Sarkarnama
मुंबई

IAS Transfer Order: राज्यातील 'या' बड्या पाच आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; कुणाची कुठे झाली बदली?

IAS Officers Transfer In Maharashtra: राज्य सरकारने शुक्रवारीच (दि.2 जून) राज्यातील 20 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या.

सरकारनामा ब्यूरो

IAS Transfer Order: राज्यातील पाच आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचा निर्णय राज्य सरकारने आज (दि.3 जून) घेतला आहे. सरकारने शुक्रवारी (दि.2 जून) राज्यातील तब्बल 20 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. त्यामध्ये तुकाराम मुंढे यांचाही समावेश होता. तर आज पाच आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

आज करण्यात आलेल्या बदल्यामध्ये आयएएस अधिकारी अनिल डिग्गीकर, मनीषा पाटणकर-म्हैसकर, डॉ.के.एच.गोविंदा राज, डॉ.संजय मुखर्जी, आशीष शर्मा यांचा समावेश आहे.

कोणत्या अधिकाऱ्याची कुठे झाली बदली?

- अनिल डिग्गीकर, उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, म्हाडा, मुंबई येथून आता उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, सिडको, मुंबई येथे नियुक्ती करण्यात आली आहे.

- श्रीमती मनीषा पाटणकर-म्हैसकर, अतिरिक्त मुख्य सचिव आणि मुख्य प्रोटोकॉल अधिकारी, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय येथून अतिरिक्त मुख्य सचिव, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि अतिरिक्त कार्यभार, अतिरिक्त मुख्य सचिव आणि मुख्य प्रोटोकॉल म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

- डॉ.के.एच.गोविंदा राज, अतिरिक्त महानगर आयुक्त- 2- एमएमआरडीए, मुंबई येथून प्रधान सचिव (2), नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई येथे नियुक्ती करण्यात आली आहे.

- डॉ.संजय मुखर्जी, उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, सिडको, मुंबई येथून एमएमआरडीए, मुंबई महानगर आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

- आशीष शर्मा, प्रधान सचिव (2), नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई यांची अतिरिक्त महानगर आयुक्त-2- एमएमआरडीए, मुंबई येथे नियुक्ती करण्यात आली आहे.

Edited By-Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT