IAS Transfer Order: मोठी बातमी! राज्यातील 20 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणत्या अधिकाऱ्याची कुठे बदली?

IAS Tukaram Mundhe Transfer : तुकाराम मुंढेची महिन्यातच पुन्हा बदली
IAS Transfer Order
IAS Transfer OrderSarkarnama

IAS Transfer Order: राज्यातील 20 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या राज्य सरकारने आज केल्या आहेत. याबाबतचे परिपत्रक सरकारकडून जारी करण्यात आले आहे. या बदल्यामध्ये तुकाराम मुंढे यांचाही समावेश आहे.

एका महिन्यापूर्वीच तुकाराम मुंढे यांची कृषी आणि पशूसंवर्धन विभागाचे अतिरिक्त सचिव नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर आता त्यांची मराठी भाषा विभागाचे सचिव म्हणून युक्ती करण्यात आली आहे. बरोबरच राज्यातील 20 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

कोणत्या अधिकाऱ्याची कुठे बदली?

- श्रीमती सुजाता सौनिक यांची आता मुंबई येथे मंत्रालयात गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदावर नियुक्ती करण्यात आली.

- एस.व्ही.आर श्रीनिवास यांची 'एमएमआरडीए'मधून धारावी पुनर्विकास प्रकल्प मुंबई येथे नियुक्ती करण्यात आली.

- श्री लोकेश चंद्र यांची'महाडिस्कॉम'च्या मुख्य व्यवस्थापकीय संचालकपदी मुंबई येथे नियुक्ती करण्यात आली आहे.

- श्रीमती राधिका रस्तोगी यांची नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई येथे नियुक्ती करण्यात आली आहे.

- श्रीमती I.A.कुंदन यांची अल्पसंख्याक विकास विभाग, मंत्रालय, मुंबई येथे नियुक्ती करण्यात आली आहे.

- संजीव जयस्वाल यांची पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागातून म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

- श्री आशीष शर्मा यांची नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई येथे नियुक्ती करण्यात आली आहे.

- श्री विजय सिंघल यांची GM, BEST, मुंबई येथे नियुक्ती करण्यात आली आहे.

- श्रीमती अंशु सिन्हा यांची सचिव, OBC बहुजन कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई येथे नियुक्ती करण्यात आली आहे.

- श्री अनुप कृ.यादव यांची सचिव, महिला आणि बालकल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई येथे नियुक्ती करण्यात आली आहे.

- श्री तुकाराम मुंढे, IAS (2005) यांची मराठी भाषा विभाग, मंत्रालय, मुंबई सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

- डॉ.अमित सैनी, IAS (2007) CEO, MMB, मुंबई यांची मिशन डायरेक्टर, जल जीवन मिशन, मुंबई येथे नियुक्ती करण्यात आली आहे.

- श्री चंद्रकांत पुलकुंडवार यांची साखर आयुक्त, पुणे येथे नियुक्ती करण्यात आली आहे.

- डॉ. माणिक गुरसाल यांची CEO, Mah.Maritime Board, मुंबई येथे नियुक्ती करण्यात आली आहे.

- श्रीमती कादंबरी बलकवडे यांची DG, MEDA, पुणे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

- श्री प्रदिपकुमार डांगे यांची संचालक, रेशीम, नागपूर या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

- श्री शंतनू गोयल यांची सिडको, नवी मुंबई सह व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

- श्री पृथ्वीराज बी.पी. यांची संचालक, माहिती तंत्रज्ञान, मुंबई येथे नियुक्ती करण्यात आली आहे.

- डॉ.हेमंत वसेकर, IAS (2015) CEO, NRLM, मुंबई यांची आयुक्त, पशुसंवर्धन, पुणे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

-डॉ.सुधाकर शिंदे (IRS) (1997) यांची AMC, BMC, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Edited By-Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com