IAS Tukaram Mundhe Sarkarnama
मुंबई

Tukaram Mundhe news : तुकाराम मुंढे येताच अधिकारी खडबडून जागे झाले; कारवाईचा जबर दणका, 192 जणांना अटक...

FDA Maharashtra, Food and Drug Administration : आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या सुचनेनुसार प्रतिबंधित अन्नपदार्थांविरुद्ध राज्यात व्यापक मोहीम राबविण्यात येत आहे.

Rajanand More

Maharashtra FDA Commissioner : राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्त पदाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर धडाकेबाज आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी लगेचच कारवाईचा धडाका सुरू केला आहे. विभागाने जून महिन्याच्या पहिल्या पाच दिवसांतच राज्यभर तब्बल १९५ धाडी टाकल्या असून त्यामध्ये १९२ जणांना अटक करण्यात आली आहे.

तुकाराम मुंढे यांची विभागात नियुक्ती झाल्यापासून अन्न व औषध प्रशासन विभागाने खडबडून जाग आल्याप्रमाणे कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पुणे जिल्ह्यातील भेसळयुक्त दारूकांड घडल्यानंतर राज्य सरकार हादरले आहे. त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागानेही कारवाईचा धडाका सुरू केला आहे. मात्र, अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कारवाईकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

विभागाचा संबंध थेट लोकांच्या दैनंदिन अन्नपदार्थांशी येतो. त्यामुळे या विभागाच्या कामाला महत्व आहे. सध्या विभागाची प्रतिबंधित गुटखा, पानमसाला व तत्सम अन्नपदार्थांविरुद्धची विशेष मोहीम सुरू आहे. ता. 1 ते 5 जून या कालावधीत तब्बल १९२ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. राज्यभर १९५ धाडी टाकण्यात आल्या आहेत. या कारवाईत 1 कोटी 99 लाख 18 हजार 475 रुपयांचा प्रतिबंधित साठा जप्त करण्यात आला आहे.

आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या सुचनेनुसार प्रतिबंधित अन्नपदार्थांविरुद्ध राज्यात व्यापक मोहीम राबविण्यात येत आहे. मोहिमेत 3 जून 2026 ला धुळे जिल्ह्यात 23 लाख 50 हजार रुपये किंमतीचा प्रतिबंधित साठा जप्त करण्यात आला. तर ४ जूनला समृद्धी महामार्गावर सावंगी टोल नाका येथील कारवाईत 60 लाख 50 हजार रुपये किंमतीचा आणि नांदेड येथील कारवाईत 17 लाख 52 हजार 450 रुपये किंमतीचा प्रतिबंधित साठा व वाहन जप्त करण्यात आले. याच दिवशी पिंपरी चिंचवडमध्ये 6 लाख 19 हजार 982 रुपये किंमतीचा साठा जप्त केला आहे.

विभागाने 5 जून रोजी केलेल्या कारवाईत परांडा येथे 1 कोटी 2 लाख 67 हजार 263 रुपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला. बृहन्मुंबई क्षेत्रात 30 धाडी टाकण्यात आल्या असून एकूण 3 लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त तर 30 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. पुणे क्षेत्रात 79 धाडीमध्ये 8 लाख 19 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त तर 78 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT