Maharashtra FDA, Narhari Zirwal and IAS Tukaram Mundhe sarkarnama
मुंबई

Tukaram Mundhe News: मोठी बातमी : डॅशिंग अधिकारी तुकाराम मुंढेंकडे पुन्हा नवी जबाबदारी; मंत्री झिरवाळांची सभागृहात घोषणा

Tukaram Mundhe new responsibility : राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभाग गेल्या महिन्याभरापासून प्रचंड चर्चेत आला आहे. मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या अखत्यारीत असलेल्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदी डॅशिंग आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती करण्यात आली होती.

Deepak Kulkarni

Mumbai News: राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभाग गेल्या महिन्याभरापासून प्रचंड चर्चेत आला आहे. मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या अखत्यारीत असलेल्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदी डॅशिंग आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती करण्यात आली होती. आयुक्तपदाचा चार्ज घेतल्यानंतर त्यांनी त्यांच्या नेहमीच्या धडाकेबाज स्टाईलनं राज्यभरात कारवायांचा धडाकाच लावला आहे.कारवायांचा दणक्यानंतर अवैध भेसळखोरांचा, गुटखा,पानमसाला,ड्रग्ज विक्रेत्यांचे अक्षरश: धाबे दणाणले आहेत. अशातच आता मुंढेंकडे नवी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी शुक्रवारी(ता.3 जुलै) विधानसभेच्या सभागृहात मोठी घोषणा केली आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या मुंबईतील प्रसिद्ध हाफकिन संस्थेला पुन्हा एकदा पूर्वपदावर आणण्यासाठी सरकारनं आता एफडीएचे आयुक्त व आयएएस अधिकारी तुकाराम मुंढेंकडे या संस्थेचा अतिरिक्त कार्यभार सोपवला आहे.

मंत्री नरहरी झिरवाळ यांनी यावेळी मुंबईतील हाफकिन संस्थेची जागा विक्री केली जाणार नाही अशी ग्वाहीही सभागृहाला दिली. सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील आमदारांनी विविध लसींची निर्मिती करणाऱ्या मुंबईतील हाफकिन बायो फार्म या संस्थेच्या आर्थिक परिस्थितीचा मुद्दा उपस्थित करत तुकाराम मुंढेंच्या नियुक्तीची मागणी करण्यात आली.

मुंबईतील हाफकिन बायो फार्म या संस्थेच्या आर्थिक स्थितीबाबतचा मुद्दा सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन्ही बाजूच्या आमदारांनी पुढे आणल्यानंतर मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सभागृहात मोठी घोषणा केली. यावेळी त्यांनी एफडीएचे आयुक्त असलेल्या तुकाराम मुंढेंकडे या मुंबईतील हाफकिन बायो फार्म या संस्थेचा अतिरिक्त पदभार सोपवला आहे.

आमदार ज्योती गायकवाड, विजय वडेट्टीवार, अमिन पटेल, योगेश सागर, अजय चौधरी, रईस शेख, अस्लम शेख, विश्वजीत कदम, विकास ठाकरे, प्रशांत ठाकूर, सुनील राऊत, अतुल भातखळकर यांनी मुंबईतील हाफकिन बायो फार्म संस्थेच्या आर्थिक स्थितीचा मुद्दा उपस्थित केला.

मंत्री नरहरी झिरवाळ यांनी यानंतर विरोधकांचा आरोप फेटाळून लावला. तसेच त्यांनी मुंबईतील प्रसिद्ध हाफकिन संस्थेची जागेची विक्री करण्यात आलेली नाही. तसेच या संस्थेचे खासगीकरण केले जाणार नसल्याचं सांगत विरोधकांचा तोही मुद्दा मंत्री नरहरी झिरवाळांनी निकाली काढला. याबाबत नेमलेल्या डॉ रघुनाथ माशेलकर समितीचा अहवाल देखील सभागृहात सादर करण्यात येईल असं मंत्री म्हणाले.

यावेळी सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील आमदारांनी मुंबईतील हाफकिन या संस्थेवर आयएएस अधिकारी तुकाराम मुंढेंच्या नियुक्तीची मागणी उचलून धरली. मात्र,यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी याबाबत महत्त्वाचं भाष्य करताना अशाप्रकारे कोणत्या संस्थेवर किंवा कोणत्या पदावर कोणत्या प्रशासकीय अधिकाऱ्याची नियुक्ती करायची याचे सर्वाधिकार सरकारकडे आहेत. विधानसभेच्या आमदारांनी सभागृहात याविषयीचे कोणतेही आदेश तसेच सूचना न करण्याचे आदेश नार्वेकरांनी यावेळी दिले.

यानंतर राज्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सभागृहात महत्त्वपूर्ण घोषणा केली. यावेळी त्यांनी मुंबईतील प्रसिद्ध हाफकिन या संस्थेचा अतिरिक्त कार्यभार वरिष्ठ आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्याकडे सोपवण्यात येणार असल्याची घोषणा केल्याची माहिती आहे. यावेळी झिरवाळ यांनी मुंढे यांच्या माध्यमातून हाफकिन ही संस्था पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याचंही त्यांनी म्हटलं.

SCROLL FOR NEXT