Parliament Monsoon Session 2026 : संसदेचे पावसाळी अधिवेशन 20 जुलैपासून गाजणार; मोदी सरकार पुन्हा आणणार 'महिला आरक्षण विधेयक'?

Women's Reservation Bill in Parliament Monsoon Session 2026: 20 जुलैपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात महिला आरक्षण विधेयक पुन्हा मांडले जाण्याची शक्यता आहे. सरकारचा अजेंडा, राजकीय प्रतिक्रिया आणि महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्या.
Parliament Monsoon Session 2026 women reservation bill
Parliament Monsoon Session 2026 women reservation billSarkarnama
Published on
Updated on

संसदेचे पावसाळी अधिवेशन 20 जुलैपासून सुरू होण्याची शक्यता असून यावेळी अधिवेशनात अनेक महत्त्वाच्या राजकीय घडामोडी पाहायला मिळू शकतात. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हे अधिवेशन सुमारे 3 आठवडे चालण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबत अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. सामान्यतः पावसाळी अधिवेशन 4 आठवडे चालते आणि त्यात जवळपास 20 बैठका होतात. यंदा बैठकींची संख्या काहीशी कमी असू शकते, अशी चर्चा आहे.

देशातील सध्याच्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन विशेष महत्त्वाचे मानले जात आहे. विविध पक्षांमधील अंतर्गत घडामोडी, खासदारांच्या गटबाजीचे प्रश्न आणि राजकीय समीकरणांमधील बदल यामुळे संसदेत जोरदार चर्चा आणि वादविवाद होण्याची शक्यता आहे.

Parliament Monsoon Session 2026 women reservation bill
Pune Police Bishnoi Gang Operation : पुण्याच्या पोलिसांच्या मास्टर प्लॅनने 'बिश्नोई' गँगचा गेम उधळला : थेट राजस्थनात जाऊन धडक कारवाई

दरम्यान, काही पक्षांतील खासदारांनी वेगळी भूमिका घेतल्याने संसदेतील संख्याबळाचे चित्र बदलताना दिसत आहे. तृणमूल काँग्रेसच्या 20 खासदारांनी एनडीएला पाठिंबा जाहीर केल्याची चर्चा आहे. तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील 9 पैकी 6 खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. याशिवाय इतर काही पक्षांतील खासदारांच्या भूमिकेमुळेही सत्ताधारी पक्षाचे संख्याबळ वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासमोर तृणमूल काँग्रेस आणि शिवसेना यूबीटीच्या काही खासदारांच्या स्वतंत्र गट मान्यतेबाबतचा प्रस्ताव प्रलंबित आहे. अधिवेशन सुरू होण्यापूर्वी या प्रस्तावांवर निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या निर्णयाचा संसदेतील राजकीय समीकरणांवर परिणाम होऊ शकतो.

Parliament Monsoon Session 2026 women reservation bill
PF Interest Rate: PF कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! EPF व्याजदराबाबत सरकारचा महत्वाचा निर्णय; रक्कम कधी जमा होणार?

याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकार पुन्हा एकदा महिला आरक्षण विधेयक संसदेत मांडू शकते, अशी चर्चा सुरू झाली आहे. मागील अधिवेशनात आवश्यक पाठिंबा न मिळाल्याने हे विधेयक मंजूर होऊ शकले नव्हते. मात्र यावेळी सत्ताधारी पक्षाचे संख्याबळ वाढल्यास विधेयक पुढे नेण्याचा प्रयत्न होऊ शकतो.

याशिवाय लोकसभा मतदारसंघांचे पुनर्रचना आणि जागावाढीबाबतही सरकार नवीन प्रस्ताव आणू शकते. मिळालेल्या माहितीनुसार सर्व राज्यांतील लोकसभा जागांमध्ये 50 टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचा पर्याय विचाराधीन आहे. त्यामुळे विविध राज्यांच्या प्रतिनिधित्वाबाबत निर्माण झालेल्या चिंता दूर करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. त्यामुळे आगामी पावसाळी अधिवेशन राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे ठरण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com