Devendra Fadnavis, Jayant Patil Sarkarnama
मुंबई

Devendra Fadnavis Vs Jayant Patil : देवेंद्र फडणवीस अन् जयंत पाटलांत 'ट्विटवॉर'; काय आहे कारण?

Per Capita Income in Maharashtra : महाविकास आघाडीच्या काळात दरडोई उत्पन्न कमी होते आता ते वाढून 2 लाख 52 हजार 389 रूपये झाल्याकडे फडणीसांनी लक्ष वेधले.

Sunil Balasaheb Dhumal

Maharashtra Political News : राज्यात पावसाळी अधिवेशन सुरू झाले असून सत्ताधारी आणि विरोधकांत विविध मुद्द्यांवरून चांगलीच खडाजंगी सुरू झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्याचा आर्थिक पाहाणी अहवाल सादर करण्यात आला. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी चिंता व्यक्त करत सरकारवर टीका केली.

त्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आकडेवारी देत माजी अर्थमंत्र्यांनीच राज्याची बदनामी करू नये अशी अपेक्षा व्यक्त केली. या दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर ट्विट करून आरोप-प्रत्यारोप केले आहेत.

जयंत पाटील Jayant Patil म्हणाले, आज राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात आला आहे. मात्र या अहवालातील खालील बाबी राज्याच्या दृष्टीने मोठी चिंता व्यक्त करणाऱ्या आहेत. याआधी दरडोई उत्पन्नात पहिल्या क्रमांकावर असलेला महाराष्ट्र आज 6 व्या क्रमांकावर गेले आहे. कर्नाटक, हरियाणा, तामिळनाडू आणि शेजारचे गुजरात राज्यही आपल्या पुढे आहेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

2022-23 या आर्थिक वर्षांत महाराष्ट्र हा पाचव्या क्रमांकावर होता. आता आपल्या राज्याची घसरण सहाव्या क्रमांकावर झाली आहे. मधल्या काळात आपल्या राज्यातील जे प्रकल्प इतर राज्यात विशेषतः गुजरातला पाठवण्यात आले त्याचे परिणाम आपल्या महाराष्ट्राला भोगावे लागले हे यातून सिद्ध होते, अशी तोफच जयंत पाटील यांनी भाजपवर डागली.

जयंत पाटलांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांनी महाविकास आघाडी सरकारमधील स्थितीची आठवण करून दिली. इतरांनी खोटी माहिती दिली तर समजू शकतो. पण, दस्तुरखुद्ध राज्याचे माजी अर्थमंत्री तेच करीत असतील, तर काय म्हणावे, असा टोलाच फडणवीसांनी जयंत पाटलांना लगावला आहे.

महाविकास आघाडीच्या काळात म्हणजे 2020-21 आणि 2021-22 या वर्षी दरडोई उत्पन्नात राज्य सहाव्या क्रमांकावर होता. त्यावेळी दरडोई उत्पन्न कमी होते. आता 2022-23 मध्ये वाढून ते 2 लाख 52 हजार 389 रूपये झाल्याकडेही फडणीसांनी लक्ष वेधले. आपल्या बाकीच्याही आरोपांवर उपमुख्यमंत्री अजित पवार बोलतील. पण, महाराष्ट्राची बदनामी किमान आपल्या हातून तरी होऊ नये, अशी अपेक्षाही फडणवीसांनी यावेळी व्यक्त केली.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT