Ajit Pawar Vs BJP : महायुतीत ठिणगी? आमच्या पुढे इतर पर्याय खुले; भाजपला अजित पवार गटाने सुनावले

Vaishali Nagwade attack On Rahul Kul : सुदर्शन चौधरी यांनी अजित पवारांना आमच्या बोकांडी बसवल्याची भाषा केल्याने महायुतीतील वाद चिघळण्याची शक्यता आहे.
Devendra Fadnavis, Ajit Pawar
Devendra Fadnavis, Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Pune Political News : लोकसभा निवडणुकीत 'मिशन 45' लक्ष्य असलेल्या महायुतीला फक्त 17 जागांवर मिळाल्या. या अपयशाचे खापर भाजप प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे अजित पवार गटावर फोडताना दिसत आहे.

आजपर्यंत दबक्या आवाजात असलेली चर्चा आता भाजपचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष सुदर्शन चौधरी आणि माजी मंत्री सुरेश धस यांच्या रुपाने चव्हाट्यावर आली आहे. त्याला अजित पवार गटाकडूनही आम्हाला इतर अनेक पर्याय उपलब्ध असल्याचे सडेतोड उत्तर देण्यात आले आहे. त्यामुळे महायुतीत ठिणगी पडण्याची चर्चा सुरू झाली आहे.

सुदर्शन चौधरी यांनी अजित पवारांना Ajit Pawar आमच्या बोकांडी बसवल्याची भाषा केल्याने महायुतीतील वाद चिघळण्याची शक्यता आहे. त्याला उत्तर देताना अजित पवार गटाच्या दौंडमधील नेत्या वैशाली नागवडे यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांचे नाव घेत भाजपवरच डाव पालटवण्याचा प्रयत्न केला.

नागवडे म्हणाल्या, भाजपने अजितदादांवर कार्यकर्त्यांकरवी अशीच टीका सुरू ठेवली तर आम्हालाही जशाततशे प्रत्युत्तर द्यावे लागेल. अजितदादांमुळे भाजपचे नाही तर भाजपमुळे राष्ट्रवादीचे नुकसान झाले आहे. चंद्रकांत पाटील यांनी बारामतीत केलेले ते विधान आठवा जरा, असे म्हणत नागवडेंनी भाजपचाच अजितदादांना फटका बसल्याचे सांगितले.

Devendra Fadnavis, Ajit Pawar
Jalgaon Sharad Pawar : लोकसभेत 80 टक्क्यांचा स्ट्राईक रेट तरीही शरद पवार गटात अस्वस्थता; नेमकं काय झालं?

भाजपने चुकूनही समजून नये, फक्त राष्ट्रवादीलाच युतीची खूप गरज हे म्हणून. आमच्यासमोर इतर पर्याय खुले आहेत. दौंडचे आमदार राहुल कुल Rahul Kul यांच्यासमोर सुदर्शन चौधरी यांनी अजितदादांवर टीका केली. त्यांचे विधान आमदार महोदयांनी विसरू नये, असा टोलाही वैशाली नागवडे यांनी आमदार राहुल कुल यांना लगावला.

सुदर्शन चौधरी नेमके काय म्हणाले?

अजित पवार यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांवर अन्याय केला आहे. अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढा. अजित पवार सत्तेत असतील तर आम्हाला सत्ता नको. पुण्याचे पालकमंत्री म्हणून अजित पवार आमच्या बोकांडी नको. डीपीटीसीचा निधी मिळायलाही कार्यकर्त्यांना अडचणी येत आहेत. कार्यकर्त्यांचं ऐकणार असाल तर एक काम करा, अजित पवारांनाच महायुतीतून बाहेर काढा. त्यांनी सुभाषबापू, राहुल कुल यांच्यावर अन्याय केला आहे, अशी टीकाच चौधरी यांनी आमदार राहुल कुल यांच्यासमोरच केली.

(Edited by Sunil Dhumal)

Devendra Fadnavis, Ajit Pawar
Ajit Pawar Vs Suresh Dhas : अजित पवार गटामुळं आमचं वाटोळं झालं; सुरेश धसांची खदखद बाहेर

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com