Kirit Somaiya Latest News Sarkarnama
मुंबई

ट्विन टॉवर पडले आता परबांचे रिसॉर्टही पडणार..

Kirit Somaiya|Anil Parab : भाजप नेते किरीट सोमय्यांनी शिवसेना नेते अनिल परब यांच्यावर टीका केली आहे.

सरकारनामा ब्यूरो

पुणे : नोएडातील ट्विन टॉवर्स अखेर जमीनदोस्त करण्यात आले आहे. १३ वर्षांमध्ये बांधलेल्या दोन इमारती अगदी काही सेकंदात कोसळल्या. हाच धागा पकडून भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी अनिल परब (Anil Parab) यांचेही रिसॉर्ट अशाच पद्धतीने जमीनदोस्त करण्यात यावे,अशी मागणी त्यानी केली आहे. तसेच नोएडातील ट्विन टॉवर पडले परबांचे रिसॉर्ट पडणार,असे ट्वीट करत त्यांनी शिवसेना (Shivsena) आणि माजी मंत्री अनिल परब यांना डिवचलं आहे. (Kirit Somaiya & Anil Parab Latest News)

दरम्यान मुख्यमंत्री शिंदेंच बंडानंतर झालेल्या सत्तांत्तरानंतर परबांचे रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील मुरुड समुद्रकिनाऱ्यावरील साई रिसॉर्ट पाडण्याचे आदेश दिल्यानंतर हालचालींना मोठा वेग आला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या भ्रष्टाचाराचे स्मारक पाडूया, अशा प्रकारचे सूचक वक्तव्य करत सोमय्या मुंबईतून निघून दापोलीत दाखल झाले होते आणि त्यांनी परबांना इशाराही दिला होता.

सोमय्या आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, अनिल परब यांच्याशी संबंधित रिसॉर्ट्स पाडण्याचे वेळापत्रक आणि एजन्सी निश्चित करण्यासाठी रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक आयोजित केली आहे. रिसॉर्ट जमीनदोस्त करण्याचा खर्च महाराष्ट्र सरकार करणार आहे. नोएडा ट्विन टॉवर पाडण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला, तशाच प्रकारे परबांचे रिसॉर्ट पाडण्याचासाठीही करावा, असे त्यांनी ट्वीटच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांना सुचवले आहे. तर दुसरे ट्वीट करत त्यांनी नोएडातील ट्विन टॉवर पडले परबांचे ट्विन रिसॉर्टही पडणार,असे ट्वीट करत परब यांना डिवचलं आहे.

दरम्यान, या रिसॉर्टमधील साहित्याची हलवाण्याबाबतची माहिती समोर येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परब यांचे रिसॉर्ट पाडण्याचे आदेश दिले आहेत. पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसवून समुद्रकिनाऱ्यावर हे साई रिसॉर्ट बांधण्यात आले आहेत. ते पाडण्याचे आदेश दिल्यानंतर सोमय्या मुरुड येथे आढावा घेण्यासाठी दाखल झाले होते. तसेच नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी परब यांच्याशी संबंधित दापोलीतील दोन रिसॉर्टवर कारवाई करण्याची शिफारस त्यांनी केली तर ६३ लाखांचा दंडही आकारण्यात येणार असल्याची माहिती देण्यात सांगण्यात आली होती. आता सोमय्या यांनी केलेल्या ट्विटवर शिवसेनेकडून काय प्रतिक्रिया येते हे बघावे लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT