शंभुराज देसाईंचा सातारा जिल्ह्याचा मास्टर प्लॅन ठरला...

shambhuraj desai : सध्याचे मुख्यमंत्री हे जमिनीवर चालणारे मुख्यमंत्री आहेत. त्यांना जास्त हवाई सफर आवडत नाही.
shambhuraj desai-uddhav thackery Latest News
shambhuraj desai-uddhav thackery Latest News Sarkarnama

कऱ्हाड : मी जसा डोंगरी भागातील आहे, तसेच सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे ही डोंगरी भागातील आहेत. त्यांचे गाव कोयना धरणाच्या बॅक वॉटरच्या परिसरात आहे. त्यामुळे त्यांना सामान्य लोकांची जान आहे.

सध्याचे मुख्यमंत्री हे जमिनीवर चालणारे मुख्यमंत्री आहेत. त्यांना जास्त हवाई सफर आवडत नाही, असे सांगून मंत्री शंभुराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे नाव न घेता अप्रत्यक्षपणे त्यांच्यावर टीका केली. मंत्री देसाई हे कऱ्हाड (जि.सातारा) तालुक्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. (shambhuraj desai,uddhav thackery & Satara Latest News)

shambhuraj desai-uddhav thackery Latest News
असे का घडले ? भुमरेंच्या कार्यक्रमात रिकाम्या खुर्च्या, अन् शिरसाटांच्या आधी खैरेंचा सत्कार..

ते म्हणाले, सातारा जिल्ह्याचा मास्टर प्लॅन करण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी माझी चर्चा झाली आहे. त्यामध्ये कोयना जलविद्युत प्रकल्प, डोगरी तालुके, पर्यटन, औद्योगीक प्रगतीसह अन्य विकासाबाबतचा आराखडा तयार करण्याचे काम सुरु आहे. महिन्याचा आत तो आराखडा करुन तो मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात येईल. मी डोंगरी भागातील आहे, तसेच मुख्यमंत्रीही डोंगरी भागातील आहेत. त्यांचे गाव कोयना धरणाच्या बॅक वॉटरच्या परिसरात आहे. त्यामुळे त्यांना सामान्य लोकांची जान आहे. सध्याचे मुख्यमंत्री हे जमिनीवर चालणारे मुख्यमंत्री आहेत. त्यांना जास्त हवाई सफर आवडत नाही. आत्तापर्यंत जेवढा निधी मिळालेला नव्हता, तेवढा निधी सातारा जिल्ह्याला मिळेल, असा विश्वास मंत्री देसाई यांनी व्यक्त केला.

shambhuraj desai-uddhav thackery Latest News
मंत्री सावंतांच्या दौऱ्याची रूपाली पाटलांनी उडवली खिल्ली; म्हणाल्या, महाराष्ट्राचे वाटोळे...

कोयना पर्यटनाचा प्रश्न लवकरच मार्गी

कोयना पर्यटनाचा विषय लवकरच मार्गी लागेल. त्यासाठी जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षक, जलसपंदा विभागाचे अधिकारी यांनी बोटींगसाठीचे ठिकाण निश्चीत केले आहे. बोटींग सुरु झाल्यावर पर्यटांचा ओघ वाढेल. नेहरु गार्डनच्या विकासासठीचा आणि निसर्ग परिचय केंद्राचा निधी मंजुर केला आहे. येत्या आठ दिवसात त्याचा आऱाखडा अंतीम मान्यतेसाठी तो प्रस्ताव मंत्रालयात सादर केला जोईल. येत्या वर्षभरात कोयनेचा कायापालट होईल, असेही ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com