मुंबई : राज्यात लवकरच महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने (ncp) मोर्चेबांधणी सुरू केली आहे. निवडणूक तयारीचा भाग म्हणून राष्ट्रवादीने येत्या ४ आणि ५ नोव्हेंबरला शिर्डीत राज्यस्तरीय शिबिराचे आयोजन केले आहे. (ncp latest news)
पक्षातील अंतर्गत विषय आणि इतर चालू घडामोडींच्या पार्श्वभूमीवर गुरूवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत सिल्व्हर ओक येथे बैठक पार पडली. बैठकीत महाराष्ट्रातील विविध भागांतील प्रश्न, कार्यकर्त्यांची निवेदने यावरही चर्चा झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला, असे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांना सांगितले. यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार उपस्थित होते.
आगामी काळात राज्यभरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या शिबिराच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना या निवडणुकीसाठी सज्ज केले जाणार आहे. या शिबिराला राज्यातील सर्वच प्रमुख कार्यकर्ते उपस्थित राहतील, असे जयंत पाटील यांनी सांगितले.
राज्यात मुंबई महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी महत्वाची सुनावणी होणार होती. मात्र, न्यायालयाच्या कामकाजात या निवडणुकांबाबतचे प्रकरण आले नाही. त्यामुळे याप्रकरणाची सुनावणी पुढे ढकलण्यात आल्याचे समजते. त्यामुळे निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.