Omicron
Omicron  Sarkarnama
मुंबई

महाराष्ट्राची चिंता वाढली; 'ओमिक्रॉन'चे दोन्ही रुग्ण आलेत दक्षिण आफ्रिकेतून

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : ओमिक्रॉन (Omicron) या कोरोनाच्या (Corona) नव्या विषाणुची लागण झालेले दोन रुग्ण भारतात आढळून आले आहेत. त्यामुळे या विषाणुने आता भारतात शिरकाव केल्याने खळबळ उडाली आहे. हे दोन्ही रुग्ण कर्नाटक (karnataka) राज्यातील असले तरी ते काही दिवसांपूर्वीच दक्षिण आफ्रिकेतून परतले आहेत.

ओमिक्रानचा पहिला रुग्ण दक्षिण आफ्रिकेत (South Africa) सापडला होता. त्यानंतर जगभरातील 29 देशांमध्ये या विषाणुने शिरकाव केला आहे. कोरोना विषाणुच्या डेल्टा प्रकारापेक्षा ओमिक्रॉन विषाणुचा संसर्ग अधिक वेगाने पसरत असल्याचा दावा तज्ज्ञांनी केला आहे. त्यामुळे जगभराची चिंता वाढली. आता भारतातही दोन रुग्ण आढळल्याने महाराष्ट्राचीही (Maharashtra) चिंता वाढली आहे.

कर्नाटक हे महाराष्ट्रालगतचे राज्य असल्याने दोन्ही राज्यांमध्ये ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. त्यामुळे ओमिक्रॉन महाराष्ट्राच्या सीमेवर येऊन ठेपला आहे. मागील काही दिवसांत मुंबईसह महाराष्ट्रात दक्षिण आफ्रिकेतून हजारो प्रवासी दाखल झाले आहेत. पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी नुकत्याच दिलेल्या माहितीनुसार, 10 नोव्हेंबरनंतर मुंबईत सुमारे एक हजार रुग्ण आढळून आले आहेत. त्यांचा शोध घेतला जात असल्याचेही त्यांनी सांगितले होते.

तसेच दक्षिण आफ्रिकेसह ओमिक्रॉनचे रुग्ण आढळेल्या काही देशांतील हजारो प्रवासी मागील काही दिवसांत राज्यात आले आहेत. त्यातील काही रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. पण अद्याप ओमिक्रॉन प्रकारच्या विषाणुची लागण झाल्याचा एकही रुग्ण नाही. ऑमीक्रोनचा संसर्ग वाढलेल्या जोखमीच्या देशातून मुंबईत आलेले 5 नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.

त्यामध्ये २१ वर्षाचा युवक १० नोव्हेंम्बरला लंडनहुन आला आहे. तर ४७ वर्षीय व्यक्ती २५ नोव्हेंम्बरला मॉरिशसहुन, ३९ वर्षीय व्यक्ती २५ नोव्हेंम्बरला दक्षिण आफ्रिकेतून तर २५ वर्षाची व्यक्ती १ डिसेंम्बरला लंडनहुन आली आहे. महाराष्ट्रात पुण्यासह कल्याण डोंबिवली व अन्य काही शहरांमध्ये असे रुग्ण आढळून आले आहेत. बहुतेकांचे नमूने जनुकीय चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. पण अद्याप एकाही रुग्णाला ओमिक्रॉनची लागण झाल्याचा अहवाल आलेला नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT