Breaking : दोन रुग्णांना ओमिक्रॉनची लागण, आरोग्य मंत्रालयानं केलं शिक्कामोर्तब

एक रुग्ण 46 वर्षीय तर दुसरा रुग्ण 66 वर्षीय आहे.
Corona
CoronaSarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली : जगभरात भीतीचे सावट असलेल्या कोरोनाच्या (Corona) नव्या ओमिक्रॉन (Omicron) विषाणुने आता भारतातही शिरकाव केल्याचे गुरूवारी स्पष्ट झालं आहे. आरोग्य मंत्रालयाकडूनही ही माहिती जाहीर कऱण्यात आली आहे. कर्नाटकातील 46 वर्षीय व 66 वर्षीय नागरिकांना ओमिक्रानची लागण झाल्याचे मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

आरोग्य विभागाय सहसचिव लव अगरवाल यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे. जगभरात आतापर्यंत 29 देशांमध्ये ओमिक्रॉनने शिरकाव केला आहे. त्यामध्ये आता भारताचाही समावेश झाला आहे. जगात या विषाणुचे आतापर्यंत 373 रुग्ण आढळून आले आहेत. सरकारकडून संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जात असून सर्व राज्यांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत.

ओमिक्रॉनचा संसर्ग टाळण्यासाठी विमानतळांवर काही ठराविक देशांतून भारतात येणाऱ्या प्रवाशांवर काही बंधनेही घालण्यात आली आहे. त्यांच्या आरटीपीसीआर चाचण्या केल्या जात आहे. या चाचण्यांमध्ये दोन रुग्णांना ओमिक्रॉनची लागण झाल्याचे समोर आले आहेत. त्यामुळे आता संबंधित देशांतून भारतात आलेल्या प्रवाशांवर सर्वच राज्य सरकारांना बारीक लक्ष ठेवावं लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com