मनसे नेते संदीप देशपांडे हल्ला प्रकरणात दोन जण पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मुंबईच्या भांडूपमधून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्कमध्ये संदीप देशपांडे यांच्यावर अज्ञातांनी हल्ला केला होता.
शनिवारी (३ मार्च) सकाळी संदीप देशपांडे शिवाजी पार्क येथे सकाळी मॉर्निंग वॉकला गेले होते. त्यावेळी चेहऱ्यावर मास्क लावून काही अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर लोखंडी रॉड आणि स्टम्पने जीवघेणा हल्ला केला. त्यांना हिंदूजा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पण देशपांडे यांच्यावरील हल्ल्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं होतं. राजकीय पक्षाच्या नेतेमंडळींकडून देशपांडेवरील हल्ल्यावर तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.
हल्ल्याची माहिती मिळताच मनसे अध्यक्ष राज ठाकरे, मनसे नेते अमित ठाकरे यांच्यासह नितीन सरदेसाई, अविनाश जाधव, अमेय खोपकर, शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर, भाजप आमदार नितेश राणे यांनी रुग्णालयात पोहचले. राजकीय वैमन्यस्यातून अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केल्याचा पोलिसांना संशय आहे.
तसेच, असे भ्याड हल्ले करुन कुणी जर आम्हांला घाबरवण्याचा प्रयत्न करणार असेल. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, आम्ही कुणाला घाबरत नाही. घाबरणार नाही. कधीच आम्ही अशा हल्ल्याला भीक घालत नाही. माझ्यावर हल्ला करण्यामागे कोण लोक आहेत. हे सर्वांना माहीत आहे. असं सूचक वक्तव्य संदीप देशपांडेंनी केलं होतं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.