Sandeep Deshpande Aggressive: रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच मनसेचे संदीप देशपांडे आक्रमक; म्हणाले,''अशा भ्याड हल्ल्यांना...!

MNS News: माझ्यावर हल्ला करण्यामागं...
Sandeep Deshpande
Sandeep Deshpande Sarkarnama
Published on
Updated on

Sandeep Deshpande News: मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर शिवाजी पार्क येथे सकाळी मॉर्निंग वॉकला गेले असताना चेहऱ्यावर मास्क लावून काही अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर चेहऱ्यावर मास्क लावून लोखंडी रॉड आणि स्टम्पने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यानंतर रग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर संदीप देशपांडे यांनी आपली पहिली रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई येथे संदीप देशपांडे यांच्यावरील हल्ल्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे. राजकीय पक्षाच्या नेतेमंडळींकडून देशपांडेवरील हल्ल्यावर तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. मात्र,आता देशपांडे यांनीही उपचारानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना हल्ल्यामागील मास्टरमाईंडला सूचक इशारा दिला आहे.

Sandeep Deshpande
BJP News: भाजपला फटका बसला, तरीही सुधारत नाही; हे सरकार म्हणजे ‘पुढे पाठ मागे सपाट’!

देशपांडे म्हणाले, हे असे भ्याड हल्ले करुन कुणी जर आम्हांला घाबरवण्याचा प्रयत्न करणार असेल. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, आम्ही कुणाला घाबरत नाही. घाबरणार नाही. कधीच आम्ही अशा हल्ल्याला भीक घालत नाही. माझ्यावर हल्ला करण्यामागे कोण लोक आहेत. हे सर्वांना माहीत आहे. असंही देशपांडे म्हणाले.

काय आहे प्रकरण?

मनसेचे नेते संदीप देशपांडे(Sandeep Deshpande) मॉर्निंग वॉकसाठी शिवाजी पार्कमध्ये गेले होते. तेव्हा शिवाजी पार्कमध्ये असलेल्या एका टोळक्याने देशपांडे यांच्यावर स्टम्पच्या सहाय्याने हल्ला केला. या हल्ल्यात देशपांडे यांच्या हाताला आणि पायाला दुखापत झाल्याचं सांगण्यात येत आहे. हल्ल्यानंतर जखमी अवस्थेतील देशपांडेंना हिंदुजा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

हल्ल्याची माहिती मिळताच मनसे अध्यक्ष राज ठाकरे, मनसे नेते अमित ठाकरे यांच्यासह नितीन सरदेसाई, अविनाश जाधव, अमेय खोपकर, शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर, भाजप आमदार नितेश राणे यांनी रुग्णालयात जात देशपांडे यांच्या तब्येतीची विचारपूस केली.

Sandeep Deshpande
Devendra Fadnavis News : फडणवीस म्हणतात ‘आम्ही पुन्हा येऊ...!’

राजकीय वैमन्यस्यातून हल्ला केल्याचा संशय...

मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्कमध्ये संदीप देशपांडे यांच्यावर अज्ञातांनी हल्ला केला. मॉर्निंग वॉकच्या वेळी ही घटना घडली. या हल्ल्यात संदीप देशपांडे यांच्या हाताला आणि पायाला दुखापत झाली. त्यांच्यावर हिंदुजा रुग्णालयात उपचार करण्यात आले. देशपांडे यांच्या हाताला आणि पायाला फ्रॅक्चर झालं आहे. राजकीय वैमन्यस्यातून अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केल्याचा पोलिसांना संशय आहे.

Sandeep Deshpande
Nashik News; प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना काँग्रेस नेत्यांचे थेट आव्हान!

आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर संशय

मनसेचे नेते अमेय खोपकर (Amey Khopkar)यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर संशय व्यक्त केला आहे. आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांना ताब्यात घेऊन पोलिसांनी त्यांची चौकशी करावी आणि जर काही तथ्य निघालं तर त्यांना अटक करावी अशी मागणीही खोपकर यांनी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com