Uday Samant | Sharad Pawar Sarkarnma
मुंबई

Uday Samant News : काँग्रेसची पोटदुखी, शिवसेनेच्या मळमळीवर उदय सामंतांचा 'उतारा'

Maharashtra Politics : तत्वाला विरोध करणं आणि व्यक्तीला विरोध करण वेगळं आहे

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुरस्कार सोहळ्याला जाऊ नये, यासाठी राज्यभरातून शिवसेना आणि काँग्रेस नेतेमंडळी आग्रह धरत आहेत. पण शरद पवार यांनी मात्र आपण या सोहळ्याला जाण्यावर ठाम असल्याचं भूमिका घेतली आहे. यावर शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी या पुरस्कार सोहळ्याचे राजकारण करू नये, असा सांगून त्यांनी शिवसेना आणि काँग्रेसला समजावण्याचा प्रयत्न केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आंतरराष्ट्रीय नेते आहेत. महाराष्ट्रात हा सत्कार होतोय ही अभिमानाची गोष्ट आहे. हा भाजपचा कार्यक्रम असता आणि त्यात पवार गेले असते तर टिका करण ठीक होतं, तत्वाला विरोध करणं आणि व्यक्तीला विरोध करण वेगळं आहे. तसेच, पवार साहेब या कार्यक्रमाला जाणं ही राजकीय संस्कृती आहे, असं उदय सामंत यांनी नमुद केलं आहे.

अनेक स्ट्रिट फर्निचरचे कंत्राट झाली, मु़ंबईत अनेक रस्त्यांचे डांबरीकरण न होता कंत्राट घेतलेली आहेत. आपले उपद्वयाप बाहेर पडू नयेत, यासाठी ही उठाठेव सुरू आहे, असा आरोपही उदय सामंत यांनी केला आहे. तसेच, कोविड घोटाळा हा कोणी केला हे माहित आहे, असा टीकाही उदय सामंतांनी केली आहे.

याचवेळी त्यांनी, उद्धव ठाकरेंच्या ठाण्यात झालेल्या सभेवरही भाष्य करत निशाणा साधला आहे. मी उद्धव ठाकरेंचे भाषण पाहिले नाही, पण त्यांचं भाषण कशावरही असलं तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरच टिका करतात. तसेच, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर अनुभवी राजकारणी आहेत. त्यांनी कोण कसं वागणार हे यापूर्वीच सागितलं होतं. मी जरी शिवसेनेसोबत असलो तरी मी काँग्रेस व राष्ट्रवादीसोबत आहे. असं कुणी समजू नये हे ते यापूर्वीच बोलले असल्याचं सामंतानी म्हटलं आहे.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT