Uday Samant
Uday Samant Sarkarnama
मुंबई

MVA News : उदय सामंत म्हणतात, महाविकास आघाडी फुटणार; युतीत येणाऱ्या आमदारांचा आकडाच सांगितला..

सरकारनामा ब्युरो

MVA MLA : एकनाथ शिंदेंनी बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी उठाव केला. त्यावेळी आमच्यावर पक्ष फोडला, खोकेंचा आरोप करण्यात आहे. त्यानंतर निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण ही निशाणी शिंदेंना दिली.

त्यानंतर प्रत्येकाच्या मानात मोठी चलबिचल निर्माण झाली. मात्र त्यापूर्वीपासूनच ठाकरे गट, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील काहीजण मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या संपर्कात आहेत.

महाविकास आघाडीतील काठावरील सुमारे १५ जण दोन-तीन महिन्यात शिवसेना किंवा भाजपमध्ये येतील. त्यामुळे संख्याबळ १८५ वर जाईल, असा दावा उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी केला आहे.

अजित पवार (Ajit Pawar) यांनी मध्यावधी निवडणुका लागतील, असे वक्तव्य केले आहे. यावर समांत म्हणाले की, "त्यांनी कसे गणित मांडले मला काही माहिती नाही. मात्र आपल्या पदाधिकाऱ्यांना नैतिक बळ देण्यासाठी त्यांना असं बोलावे लागते. आतांच सरकारमधील संख्याबळ आणि संपर्कात असलेले १५ आमदार पाहता मध्यावधी निवडणुका लागायची काही शक्यता नाही."

काँग्रेसचे रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी कसब्यात भाजपकडून पैशांचा वापर होत असून पोलीसही कारवाई करीत नाहीत, असा आरोप केला. याचा सामंत यांनी समाचार घेतला. सामंत म्हणाले की, "एखाद्याला पराभव समोर दिसत असला की असे आरोप करू लागतो. यातून त्यास सहानुभूती मिळण्याची शक्यता वाटते. त्यांच्याकडे भाजपच्या शहराध्यक्षाने पुरावे देण्याची मागणी केली आहे. हा एक त्यांचा सहानुभूती मिळविण्यासाठी राजकीय स्टंट आहे."

शरद पवार (Sharad Pawar) पहाटेच्या शपथविधीमुळे राष्ट्रपती राजवट जाण्यास मदत झाली, हे वक्तव्य चेष्टेत केले, असे म्हणाले. यावर सामंत म्हणाले की, "दोन दिवसापूर्वी केलेल्या विधानावरच त्यांनीच खुलासा केला आहे. त्यांचा तो वैयक्तीक खुलसा आहे. त्यांनी हे वक्तव्य कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केले आहे. मात्र त्या दोन्ही जागा भाजप मोठ्या फरकाने जिंकणार आहेत.

शहरांच्या नामांतरबाबत कुणी श्रेय घेण्याची गरज नसल्याचेही सामंतांनी सांगितले. ते म्हणाले, "औरंगाबादचे (Aurangabad) संभाजीनगर आणि उस्मानाबादचे (Osmanabad) धाराशिव केल्याबद्दल कोणी श्रेय घेण्याची काही गरज नाही. सरकार जात असताना एका दिवसात घाईने निर्णय घेणे राजकीय निर्णय असू शकतो. त्यानंतर सक्षम सरकार असताना निर्णय घेणे यात फरक आहे. आताच्या सरकारने निर्णय घेतला आणि त्यास केंद्राने मान्यता दिली."

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे पोपट आहेत, असे इम्तियाज जलील (Imtiyaj Jallil) म्हणाले आहेत. त्यावर सामंत यांनी जलील यांना शिंदेंच्या गाडीत बसून राज्यभर फिरण्याची सूचना केली. समांत म्हणाले, "जलील यांनी एकनाथ शिंदे यांच्याबरोबर महाराष्ट्रभर फिरावे. शिंदे लोकनेता असून ठाण्याबाहेरही राज्यभर त्यांचे वलय आहे. त्यामुळे काहींना पोटसूळ आहे. पुण्यातील त्यांचा रोडशो ना भूतो ना भविष्य असा झाला आहे. यातून त्यांची प्रसिद्धी लक्षात येते."

औरंगाबाद शहराचं नाव संभाजीनगर झालं तर औरंगाबाबत जिल्ह्याचं काय, या आंबादास दानवे (Ambadas Danave) यांच्या प्रश्नाचाही समंत यांनी समाचार घेतला. सामंत म्हणाले, "एखादी गोष्ट चांगली झाल्यानंतर त्यांचे कौतूक करण्याऐवजी त्याला फाटे फोडणे असे काहीजण राजकीय उद्योग करीत असतात. त्याला काही अर्थ नसतो."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT