Congress News : 2024 साठी काँग्रेसची नवी घोषणा : 'सेवा, संघर्ष, बलिदान - सर्वप्रथम हिंदुस्थान..'

Congress News : काँग्रेस सर्व विरोधीपक्षांसोबत एकत्र यायला तयार आहे..
Congress News : 2024 | Mallikarjun Kharge
Congress News : 2024 | Mallikarjun Kharge Sarkarnama

Congress News : छत्तीसगडची राजधानी रायपूर येथे सुरू असलेल्या काँग्रेसच्या ८५ व्या राष्ट्रीय अधिवेशनात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी काँग्रेस पक्षाची नवी घोषणा दिली आहे. 'सेवा, संघर्ष, बलिदान - सर्वप्रथम हिंदुस्थान' ही पक्षाची नवी घोषणा असेल, असे खर्गे म्हणाले. तर पक्षाच्या नेत्या व माजी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी आपल्या भाषणात सक्रिय राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिले. सोनिया गांधी आपल्या भाषणात म्हणाल्या की, "भारत जोडो यात्रेने माझी राजकीय खेळी आता अंतिम टप्प्यात आली आहे."

अधिवेशनात काँग्रेस नेत्यांना संबोधित करताना काँग्रेस अध्यक्ष खरगे म्हणाले, महात्मा गांधी, पंडित नेहरू, सुभाषचंद्र बोस, सरदार पटेल, मौलाना अबुल कलाम आझाद, डॉ राजेंद्र प्रसाद, सरोजिनी नायडू, इंदिरा गांधी आणि राजीव यांच्या गौरवशाली वारशाचे आपण सर्वजण प्रतिनिधित्व करत आहोत.आज प्रत्येक काँग्रेसचा कार्यकर्ता, प्रत्येक देशवासीयाला पुढे जाऊन ‘सेवा, संघर्ष आणि बलिदान सबसे पहले हिंदुस्तान' असा संदेश देईल. हीच आमची घोषणा असेल. आज देशाला त्याची गरज आहे, कारण भारत वेगळ्या कठीण काळातून जात आहे.

Congress News : 2024 | Mallikarjun Kharge
Pune By-Election : व्होटींग कार्ड नाही? टेंशन घेऊ नका, 'या' बारा कागदपत्रांपैकी एक पुरावा दाखवून करा मतदान !

भाजप RSS विरोधात सर्व पक्षांची एकजूट व्हावी :

काँग्रेस अध्यक्ष खरगेंनी आपल्या भाषणात विरोधी पक्षांच्या एकजूटीबद्दल भाष्य केले आहे."2023 आणि 2024 मध्ये आमचा अजेंडा स्पष्ट आहे. देशाच्या प्रश्नांवरही आम्ही संघर्ष करू, बलिदान देऊ आणि सशक्त आणि समृद्ध राज्य येण्यासाठीमआम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू. 2004 ते 2014 या काळात अनेक समविचारी पक्ष यूपीए आघाडीत आमचे सहयोगी होते. 10 वर्षे आमचे सरकार कॉमन मिनिमम प्रोग्राम काम करायचे. आज पुन्हा तीच आघाडी आणखी मजबूत करण्याची गरज आहे. भाजप-आरएसएसच्या विरोधात असलेल्या सर्व पक्षांना सोबत घेण्यास आम्ही तयार आहोत.

भाजप घटनात्मक संस्थांची पायमल्ली करत होते :

काँग्रेस अध्यक्ष म्हणाले, "आज मोदी सरकारच्या काळात गरीब आणि श्रीमंत यांच्यातील दरी वाढली आहे. दलित, आदिवासी, अल्पसंख्याक, मागास, शेतकरी, मजुरांवर अत्याचार होत आहेत. 2015 पासून दलित आणि आदिवासींवरील अत्याचार वाढत आहेत. सरकारच्या धोरणांना शेतकरी,मजूर कंटाळले आहेत. अशा धोरणांमुळे शेतकरी, मजुरांना आत्महत्या करण्यास सरकारने भाग पाडले आहे.

भाजप सर्व घटनात्मक संस्थांची पायमल्ली करत आहे. देशात सर्वत्र द्वेषाचे वातावरण आहे. आज केंद्रीय यंत्रणांच्या मदतीने लोकशाही पद्धतीने निवडून आलेले सरकार पाडले जात आहे. काँग्रेसचे अधिवेशन रोखण्याचाही प्रयत्न झाला. मात्र छत्तीसगडचे मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेत्यांनी याविरोधात जोरदार लढा उभारला. अशा पद्धतीने लढायला शिकले पाहिजे, आता रडून चालणार नाही."

खरगे पुढे म्हणाले, "आज देशात नोटाबंदी आणि जीएसटीच्या चुकीच्या अंमलबजावणीमुळे १२ कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या, तर दुसरीकडे करोडो लोक दारिद्र्यरेषेखाली आले. गंगा नदी कोविडमध्ये हजारो मृतदेहांनी वाहत होती. देशातील काही मूठभर लोकांची संपत्ती एवढ्या वेगाने वाढली की, ते जगातील श्रीमंतांमध्ये गणले गेले. कोरोनाच्या काळात देशातील जनतेला डॉक्टर आणि औषधे मिळाली नाहीत. "

यावेळी खरगेंनी भारत जोडो यात्राबाबतही बोलले. ते म्हणाले, "राहुल गांधींनी अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली. कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत आता वेगळे वातावरण पसरले आहे. राहुल गांधी यांनी कशाचीच भीती न बाळगता, कसली पर्वा न करता ही यात्रा पूर्ण केली.देशाची सेवा केली आहे."

Congress News : 2024 | Mallikarjun Kharge
West Bengal: मोठी बातमी! केंद्रीय मंत्री निशीथ प्रामाणिक यांच्या ताफ्यावर हल्ला, गाडीची तोडफोड

काँग्रेसच्या घटनेत मोठे बदल :

काँग्रेसच्या घटनेत मोठे बदल करण्यात आले. यामध्ये, अनुसूचित जाती, आदिवासी, अल्पसंख्याक आणि मागासवर्गीयांसाठी AICC प्रतिनिधी आणि सर्व पदांच्या 50 टक्के जागा राखीव असतील. 50 टक्के पदे ही 50 वर्षांखालील व्यक्तींकडे असतील. 1 जानेवारी 2025 पासून काँग्रेसमध्ये कागदोपत्री सदस्यत्व नसेल, फक्त डिजिटल सदस्यत्व ग्राह्य धरले जाईल. त्याचबरोबर तृतीय लिंगाबद्दलही तरतूद असणार आहे.

फॉर्ममध्ये आई आणि पत्नीचेही नाव लिहिले जाणार आहे. ब्लॉक, जिल्हा आणि राज्य पातळीवर जिथे जिथे काँग्रेसचे निवडून आलेले सदस्य असतील, तिथे ते सर्व प्रतिनिधी असतील. सदस्यत्वापासून सक्षमीकरणापर्यंत आता सहा पीसीसी प्रतिनिधी सदस्यांवर एक एआयसीसी सदस्य निवडला जाईल. आतापर्यंत आठ जणांची निवड झाली होती. AICC सदस्यांची संख्या 1240 वरून 1653 पर्यंत वाढेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com