Uddhav Thackeray, Uday Samant, Prakash Ambedkar
Uddhav Thackeray, Uday Samant, Prakash Ambedkar  Sarkarnama
मुंबई

Uday Samant : वंचित-ठाकरे गट युतीवर उदय सामंतांची एकाच वाक्यात प्रतिक्रिया; म्हणाले...

सरकारनामा ब्यूरो

Thackeray Group And Vanchit Alliance : मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीची युती जवळपास निश्चित झाली आहे. या युतीविषयी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी महत्वपूर्ण विधान केल्यामुळे शिवशक्ती भीमशक्तीचा प्रयोग मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत पाहायला मिळण्याची शक्यता आहे. मात्र, या युतीवर शिंदे गटाचे नेते व उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी एकाच वाक्यात प्रतिक्रिया दिली आहे.

उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. सामंत म्हणाले, ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीची युतीवर मला एवढंच कळतं. ज्यांच्यासोबत रामदास आठवले आहेत त्यांचीच सत्ता येते. आणि आमच्यासोबतसुद्धा आंबेडकर चळवळीतील अनेक नेते आहेत. त्यामुळे काळजी करण्याचं काही कारण नाही.

योगी आदित्यनाथ यांचं महाराष्ट्रात स्वागतच, पण...

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबई दौर्यात ते काही उद्योगपतींची भेट घेणार आहे. यावरुनच महाराष्ट्रातील काही प्रकल्प जसे गुजरातला गेले तसेच आता पुन्हा एकदा महाराष्ट्रातील उद्योग प्रकल्प उत्तर प्रदेशला जाणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे.

यावर उदय सामंत यांनी म्हणाले, योगी आदित्यनाथ यांचं महाराष्ट्रात स्वागतच केलं जाईल. आणि याआधीही उद्योगधंदे कधी महाराष्ट्र बाहेर गेले नाहीत. यापुढेही जाणार नाही. यावेळी त्यांनी योगी आदित्यनाथ यांच्या मुंबई दौर्यात मुख्यमंत्री आणि त्यांची भेट होणार का नाही याबद्दल त्यांनी आपल्याला माहिती नाही असं उत्तर देत यावर अधिक भाष्य करण्याचं टाळलं.

मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री 'डाओस'बाबत निर्णय घेतील...

मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे डाओसला जाण्याविषयी निर्णय घेतील. मात्र,मागच्या वर्षीपेक्षा दुप्पट एमओयु यावर्षी होतील. 71 हजार कोटींच्या प्रकल्पांना एक महिन्यापूर्वी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि मी जी कॅबिनेट सब कमिटी आहे यामध्ये मान्यता दिली आहे. यामध्ये 50 ते 55 हजार रोजगार निर्माण होतील. उद्योग येऊ नयेत यासाठी सुपारी घेऊन काही हालचाली चालू आहेत का? अशी शंका आहे. पण उद्योगांसाठी सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. आपल्या राज्याचे वातावरण दूषित आहे हे दाखवण्याचं काम कोणी करु नये असेही सामंत यांनी यावेळी सांगितले.

वीज कर्मचार्यांच्या संपावर लवकरच निर्णय..

राज्यात महावितरणच्या वीज कर्मचार्यांनी पुकारलेल्या संपावर भाष्य करताना सामंत म्हणाले, वीज कर्मचार्यांच्या संपाचा फटका सगळ्यांना बसणार आहे. याची पूर्वकल्पना होती. त्यामुळे संपावर लवकरात लवकर तोडगा काढण्यासोबतच योग्य तो निर्णय घेण्याचा मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री प्रयत्न करतील असा विश्वासही सामंत यांनी व्यक्त केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT