Maratha Kranti Morcha : 'मविआ' नंतर आता शिंदे-फडणवीसांच्या विरोधात मराठा क्रांती मोर्चा आक्रमक

Maratha Kranti Morcha : कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे.
Maratha Kranti Morcha
Maratha Kranti Morchasarkarnama

Maratha Kranti Morcha : छत्रपती शिवाजी महाराज (chhatrapati shivaji maharaj), छत्रपती संभाजी महाराज (chhatrapati sambhaji maharaj) यांच्यासह अनेक महापुरुषांविषयी वादग्रस्त विधान सध्या केली जात आहेत, याचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे. (Maratha Kranti Morcha news update)

महापुरुषांच्या अपमानाबाबत राज्य सरकार भूमिका घेत नाही, म्हणून मराठा क्रांती मोर्चा आता मैदानात उतरला आहे. सत्ताधारी आणि विरोधक स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी महापुरुषांना बदनाम करत असल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाने केला आहे.

Maratha Kranti Morcha
Nitesh Rane : राजकारण पेटलं : राणेंनी आव्हाडांना दिली हिंदू मंदीरांची यादी..

महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांवर शिेंदे-फडणवीस सरकारने राष्ट्रदोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक विनोद पाटील यांनी केली आहे. ते मंगळवारी पंढरपूर येथे माध्यमांशी बोलत होते.

पंढरपुरातील (pandharpur) पहिल्या मराठा भवन इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी विनोद पाटील आले होते. यावेळी त्यांनी ही मागणी सरकारकडे केली आहे.

Maratha Kranti Morcha
Narendra Modi : मोदींच्या मंत्रीमंडळात शिंदे गटातील दोघांच्या गळात मंत्रीपदाची माळ पडणार..

विनोद पाटील म्हणाले, "महापुरुषांविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या व्यक्तींवर राज्य सरकारने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी केली. या संदर्भात राज्य सरकारने विधिमंडळात तसा कायदा करावा, यासाठी मराठा क्रांती मोर्चाने (maratha kranti morcha) राज्य सरकारला लेखी निवेदन दिले आहे,"

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे.महाराष्ट्रातील विरोधी पक्षांसह सर्वसामान्य लोकांकडूनही राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला जातोय.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com