Udayanraje Bhosale : छत्रपती शिवाजी महाराज याच्याबाबत वादग्रस्त विधान करणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर कारवाई करावी, यासाठी महाराष्ट्रातील खासदारांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. या बैठकीबाबत छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज, खासदार उदयराजे भोसले यांनी माध्यमांना माहिती दिली.
उदयनराजे भोसले म्हणाले, "राज्यपाल कोश्यारी यांच्यावर कारवाई करण्याबाबत राज्यातील सर्वपक्षीय खासदारांचे एकमत झाले आहे. कोश्यारींच्या विधानाची राष्ट्रपतींनी दखल घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही पत्र दिले आहे. मोदी याबाबत गांर्भीयाने विचार करतील, ही अपेक्षा आहे. या विषयाकडे राजकारणाच्या नजरेतून पाहू नका,"
"कोश्यारींवरील कारवाईबाबत मोदींनी दखल घेतली आहे, कोश्यारींवरील कारवाईबाबत ते लवकरच निर्णय घेतील, प्रक्रियेनुसार कारवाई करतील," असे उदयनराजेंनी सांगितले. "राज्यपालांनी केलेल्या विधानाला भाजप जबाबदार नाही,"असे उदयनराजे म्हणाले. राज्यपाल माफी मागत नाही, याची खंत आहे, असेही ते म्हणाले.
कोश्यारींच्या वादग्रस्त विधानाबाबत माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे. ते पिंपरी-चिंचवड येथे सर्वपक्षीय आंदोलकांच्या सभेत बोलत होते. यावेळी छत्रपती संभाजी राजे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांना टोला हाणला.
छत्रपती संभाजी राजे यांनी पिंपरी- चिंचवड मधील सर्वपक्षीय बंदला पाठिंबा देत सत्ताधाऱ्यांवर चौफेर टीका केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि इतर महापुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्ये करणाऱ्या व्यक्तीविरोधात आज एक दिवसीय बंद पाळण्यात आला. यां बंदला संभाजीराजेंनी पाठिंबा दर्शवला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.